BJP MLA Shivendraraje Bhosale  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

APMC Result : उदयनराजेंच्या 'स्वाभिमानाचा' चकणाचूर; शिवेंद्रराजेच 'अजिंक्य'

Udayanraje Bhosale स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनेलच्या असून खासदार उदयनराजे भोसले गटाने बाजार समितीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना यश आले नाही.

Umesh Bambare-Patil

Satara APMC Election Result : सातारा बाजार समिती निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत सर्व १८ जागा जिंकत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale गटाच्या अजिंक्य पॅनेलने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale गटाच्या पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. खासदार उदयनराजे भोसले गटाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनेलच्या आडून बाजार समितीत प्रवेश करण्याचा प्रयत्न फसला.

सातारा बाजार समितीच्या 18 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनेलच्या असून खासदार उदयनराजे भोसले गटाने बाजार समितीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना यश आले नाही. आज सकाळी मतमोजणीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाच्या अजिंक्य पॅनेलने आघाडी घेत व्यापारी मतदारसंघातुन अमीन कच्छी (633 मते)आणि बाळासाहेब घोरपडे (668 मते) हे विजयी झाले. खासदार गटाला धक्का बसला.

स्वाभिमानाच्या पॅनेलचे उमेदवार तानाजी किर्दत (174 मते) आणि स्वप्नील घुसाळे (174 मते) यांचा पराभव झाला. त्यानंतर हमाल मापाडी मतदारसंघातून अनिल जाधव (39 मते)विजयी झाले. तर विरोधी स्वाभिमानी आणि खासदार उदयनराजे गटाच्या पॅनेलचे प्रकाश आटवे (14 मते) यांचा पराभव झाला.

त्यानंतर सोसायटी मतदारसंघाची मतमोजणी झाली. यामध्ये आमदार गटाच्या अजिंक्य पॅनेलने सर्व 11 जागा तब्बल 750 ते 800 मतांच्या फरकाने जिंकल्या. यामध्ये आमदार गट अजिंक्य पॅनेलचे उमेदवार व मते अशी आहेत. रमेश चव्हाण (१२५६), विक्रम पवार (१२७८), भिकू भोसले (१२६२), धनाजी जाधव (१२२४), मधुकर पवार (१३०४), राजेंद्र नलवडे (१२५४), विजय पोतेकर (१२८९), वंदना कणसे (१३३८), आशा गायकवाड (१४०४), दत्तात्रय कोकरे (१३१४), इसुफ पटेल (१२९७).

खासदार उदयनराजे (पुरस्कृत) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनेलचे पराभूत उमेदवारांना मिळालेली मते दत्तात्रय जाधव (३११), सुदाम जाधव (३०७), राहुल ढाणे (३०५), संजय नलवडे (३०२), दत्तात्रय मोरे((३१७), उत्तम शिर्के (२८६), अर्जुन साळुंखे (२८६), शोभा भोसले (३३३), रत्नमाला जाधव (३५१), नारायण शेंडगे (३७२), राजकुमार ठेंगे (३८४).

ग्रामपंचायत मतदारसंघातील शिवेंद्रसिंहराजे गटाच्या अजिंक्य पॅनेलचे विजयी उमेदवार असे आनंदराव कणसे (११३९), अरुण कापसे (११००), शैलेंद्र आवळे (११०९), संजय पवार (११०३). खासदार उदयनराजे (पुरस्कृत) स्वाभिमानी शेतकरी संघटना पॅनेलचे पराभूत उमेदवार व त्यांना पडलेली मते विश्वजीत लाड (३३८), सर्फराज शेख (२९४), विशाल गायकवाड (३५७), शांताराम गोळे (३६५). विजयानंतर अजिंक्य पॅनेलच्या उमेदवार व समर्थकांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT