Satara APMC election : आठ बाजार समितींसाठी चुरशीने 93.33 टक्के मतदान मतदारांचा कौल मतपेटीत बंद...

APMC Election जावळी महाबळेश्वर बाजार समितीची निवडणूक काल झाली असून आज रविवारी उर्वरित आठ बाजार समितींसाठी मतदान झाले.
Satara APMC Election Voting
Satara APMC Election Votingsarkarnama
Published on
Updated on

Satara APMC News : आठ शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी रविवारी जिल्ह्यातील 122 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वच बाजार समितीत चुरशीचे मतदान झाले असून आठ बाजार समितीत 93.33 टक्के मतदान झाले आहे. भाजप BJP, राष्ट्रवादी NCP, कॉंग्रेस, शिवसेना, स्वाभिमानीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून सर्वच उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे. सोमवारी मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यात एकुण नऊ बाजार समित्याच्या निवडणुक प्रक्रिया सुरू झाली होती. यापैकी जावळी महाबळेश्वर बाजार समितीची निवडणूक काल झाली असून आज रविवारी उर्वरित आठ बाजार समितींसाठी मतदान झाले. सर्वच ठिकाणी चुरशीसे 93.33 टक्के मतदान झाले आहे. बहुतांश बाजार समितीत निवडणूक पक्षीय पातळीवर न होता स्थानिक आघाड्या करून निवडणूकीस सामोरे गेले होते.

जिल्ह्यात सर्वाधिक कऱ्हाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे लक्ष वेधून घेतले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, युवा नेते उदयसिंह पाटील यांच्या विरोधात माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील balasaheb patil, भाजपचे युवा नेते अतुल भोसले यांचे पॅनेल उभे केले आहे. सकाळपासून चुरशीने जिल्ह्यात सर्वाधिक समितीसाठी ९७.१९ टक्के मतदान झाले आहे.

Satara APMC Election Voting
Satara APMC : शिवेंद्रराजेंनी कोणत्या संस्था शाबूत ठेवल्यात; हिंम्मत असेल तर गांधी मैदानावर यावे : उदयनराजेंचे आव्हान

सातारा कृषि उत्पन्न बाजार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सत्ता असून या निवडणुकीत आमदार भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य पॅनेल विरुध्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पॅनेल उभे केले असून त्यांना खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे येथे चुरश निर्माण झाली आहे.

Satara APMC Election Voting
Karnataka Election : BJP उमेदवाराची JDS च्या उमेदवाराला धमकी ; Audio Clip व्हायरल ; अर्ज मागे घ्या, अन्यथा..

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत ९४ टक्के मतदान झाले आहे. पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री शभुंराज देसाई यांच्या पॅनेल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सत्यजित पाटणकर यांचे पँनेल असून या ठिकाणी ९३ टक्के मतदान झाले आहे. कोरेगाव तालुक्यात आमदार महेश शिंदे mahesh Shinde यांच्या विरोधात आमदार शशीकांत शिंदे यांचे पॅनेल असून या ठिकाणी ९५ टक्के मतदान झाले आहे.

Satara APMC Election Voting
Karad Bazar Samiti Result: कराडच्या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण मारणार बाजी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com