Shivendrasinhraje Bhosale
Shivendrasinhraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : शिवेंद्रसिंहराजेंचा आघाडीवर हल्लाबोल ; म्हणाले, "भ्रष्टाचाराचा उगम..

सरकारनामा ब्युरो

Shivendrasinhraje Bhosale News : सातारा पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदार टीएनटी कंपनीच्या माध्यमातून उत्खनणाचा दगड परस्पर विकण्यात आला या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकल्पात आर्थिक देवाण-घेवाण झाली आहे का, हे समजणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, "सातारा शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या संदर्भातही गुन्हेगारांना कायद्याच्या धाकाने ठेचून काढले पाहिजे. सातारा शहरात ज्याप्रमाणे तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी दत्ता जाधव यांच्या ज्या पद्धतीने मुस्क्या आवळल्या तशीच कठोर कारवाई विद्यमान पोलीस अधीक्षक यांनी केली पाहिजे. खंडणीच्या माध्यमातून इतराने कारवायांच्या माध्यमातून सातारा शहरातील व्यापारी व्यावसायिक यांना विनाकारण लक्ष केले जात आहे,"

शांतता प्रिय साताऱ्याच्या शहराच्या लौकिकाला बाधा उत्पन्न होत आहे. त्यामुळे सातारा पोलिसांनी बेस्ट पोलिसिंग करून गुन्हेगारांना वचक बसेल अशा ठोस कारवाया कराव्यात. या संदर्भात पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी मी स्वतः चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विसावा नाका येथील सातारा पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामातूनच भ्रष्टाचाराचा उगम झाला आहे. या संदर्भात सातारा जिल्हाधिकारी व पालिका प्रशासनाचे प्रशासक यांनी तातडीने लक्ष घालून त्याची चौकशी करावी व सातारकर जनतेचे नुकसान टाळावे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.

या कामांमध्ये जो गैरव्यवहार झाला आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे. मुळातच या कामाच्या संदर्भात आघाडीचे नेते आणि त्यांच्या बगलबच्चांनी काय तोड केली आहे, हे समजणे गरजेचे आहे. या कामातूनच भ्रष्टाचाराचा उगम झाला आहे, असे उत्खनन परस्पर विकले जाणे याची जिल्हाधिकारी व पालिका प्रशासक यांनी सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

प्रशासक यांनी तर चौकशी करून काय ते समोर आणावे अन्यथा त्यांच्यावरच ती जबाबदारी राहील या प्रकरणाचे सत्य समोर आणून सातारकर यांचे नुकसान टाळावे असेही आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT