Prakash Ambedkar News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित विकास आघाडीची नुकतीच युती झाली आहे.मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ही युती आहे.
या युतीत सामील होण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसही इच्छुक असल्याची चर्चा आहे. पण वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
"राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आजही भाजपसोबतच आहेत," असा दावा खळबळजनक वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा केला. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
आंबेडकरांनी पवारांविषयी केलेल्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट करीत आंबेडकर आणि आघाडीतील मित्रपक्षाच्या नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
"महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही.तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी. सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही," असे आव्हाड यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार हे आजही भाजपसोबतच आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. हा दावा करताना प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन दिली.
या शपथविधीचा खुलासा अजित पवार यांनी केला होता. मला दोष कशाला देता. आमच्या पक्षाचा तो निर्णय होता. लोकसभा निवडणुकीआधीच सर्व ठरले होते. मी फक्त पुढे गेलो, असे अजित पावार यांनी सांगितले होते. त्यामुळे शरद पवार हे अजूनही भाजपसोबतच आहेत हे लवकरच कळेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.