Eknath shinde-Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Parishad Election : दोन्ही शिवसेनेच्या ‘वाघां’ची विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार; सोपल, माेहिते पाटलांची मनधरणी यशस्वी होणार का?

Solapur Political News : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने आता उर्वरित प्रमुख उमेदवारांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 04 June : सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीतून दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात अखेर आता चार उमेदवार उरले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख आणि आमदार दिलीप सोपल समर्थक नागेश अक्कलकोटे आणि आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

सोलापूर विधान परिषदेच्या निवडडणुकीतून शिवसेनेचे महेश साठे, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा कुर्डूवाडीचे माजी नगराध्यक्ष धनंजय डिकोळे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे राज्यातील इतर जागांप्रमाणे सोलापूरची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याकडे राज्याचे लक्ष लागल आहे.

महेश साठे, रमेश बारसकर, धनंजय डिकोळे यांनी माघार घेतल्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, बार्शीचे आमदार दिलीप सोपल समर्थक नागेश अक्कलकोटे आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांचे अर्ज राहिले आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघ्या अर्धा तासाचा कालावधी राहिला आहे, त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे हे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या समर्थकांचे अर्ज मागे घ्यावेत, यासाठी यशस्वी ठरतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन केले होते. ते कालपासून सोलापुरात तळ ठोकून आहेत. मात्र, मोहिते पाटील, सोपल समर्थक उमेदवारांनी अजूनही माघार घेतलेली नाही. तसेच आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानरकही रिंगणात आहेत. त्यामुळे सोलापूकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT