Sunil Tingre News : पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चूरस होती. विक्रम काकडे यांच्यासोबत सुनील टिंगरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे उमेदवार कोण असणार याची चर्चा होती. माजी आमदार सुनील टिंगरे हे देखील ही निवडणूक लढण्यास इच्छुक होते.
टिंगरे यांना शेवटच्या क्षणी पक्षाने त्यांना उमेदवारी दाखल करण्यास सांगितल्याने त्यांनी देखील उमेदवारी दाखल केली होती. अधिकृत उमेदवाराच्या फाॅर्ममध्ये काही अडचण आली तर बॅकअप म्हणू टिंगरेंचा अर्ज दाखल असल्याचे सांगितले जात होते. अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज (गुरुवारी) टिंगरेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे हे मैदानात असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. अजून उमेदवारी मागे घेण्यास काही वेळ असल्याने ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
महायुतीमध्ये ठिकठिकाणी बंडखोरी झाली आहे. बंडखोरी थांबवण्यासाठी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महायुतीचे नेते अॅक्शन मोडवर आहेत. मंत्री उदय सामंत यांनी परभणीती बंडखोराची समजूत काढली आहे. तर, मंत्री गिरीश महाजन यांनी गणेश गीते यांना नाशिमधून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास समजवले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल करणाऱ्या बाळ माने यांची महायुतीमधील मंत्री नितेश राणे यांनी समजूत काढली असून बाळ माने यांनी अर्ज मागे घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.