Kolhapur mayor election;dhananjay mahadik, Satej Patil and Rajesh Kshirsagar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur mayor election : सतेज पाटलांच्या ‘बॅक डोअर चर्चांना’ पूर्णविराम!महाडिकांविरोधातील डावही फसला? शिंदेच्या शिलेदारानं विषयचं संपवला

Congress Satej Patil Vs Shivsena Rajesh Kshirsagar : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरच्या महापौर पदावरून ट्वीस्ट निर्माण करत बॅक डोअर सुरू असलेल्या चर्चा फ्रंटवर कशाला करायच्या, असे सूचक विधान केले होते.

Aslam Shanedivan

  1. सतेज पाटील यांच्या सूचक विधानामुळे कोल्हापुरच्या महापौर पदावर राजकीय चर्चांना वेग आला.

  2. भाजपमध्ये या वक्तव्यानंतर अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली.

  3. शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना काँग्रेससोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

Kolhapur mayor election News : नुकताच कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून येथे महायुतीची सत्ता बसली आहे. भाजपला महायुतीत सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजपने महापौर पदावर क्लेम केला आहे. तर शिंदेच्या शिवसेनेनं देखील महापौर पदावर क्लेम करत ते अडीच अडीच वर्षांसाठी विभागलं जावं अशी मागणी केल्याची चर्चा आहे. यातच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरच्या महापौर पदावरून ट्वीस्ट निर्माण वक्तव्य केलं होते.

सतेज पाटील यांनी, बॅक डोअर सुरू असलेल्या चर्चा फ्रंटवर कशाला करायच्या, से सूचक विधान केल्याने भाजपसह महायुतीत खळबळ उडाली आहे. तसेच ते भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर दाव टाकणार अशी चर्चा सुरू झाल्या होत्या. या सर्व चर्चा आणि अफवांवर शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी पलटवार करत महापौरपदासाठी शिवसेना काँग्रेससोबत कधीच जाणार नाही, असे स्पष्ट केलं आहे. या स्पष्टीकरणानंतर आता काँग्रेसला विरोधातच बसावे लागणार हे चित्र स्पष्ट झाले आहे.

यावेळी आमदार क्षीरसागर यांनी, महानगरपालिकेतील महापौर हा महायुतीत सर्वमान्य असेल. त्याबाबत नेत्यांची बैठक होऊन नाव निश्‍चित होईल’. तसेच महापौरपदासाठी शिवसेना काँग्रेससोबत कधीच जाणार नाही. महायुतीत सर्वांची एकी आहे. त्यातूनच पुढील पाच वर्षांचे महापौर ठरविले जातील,’ असेही आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं आहे.

महायुतीत महापौर भाजपचाच असेल, असे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्‍ट केले आहे. याचवेळी शिवसेनेला महापौर पद मिळणार की नाही, याबाबत आमदार क्षीरसागर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘महापालिकेतील महापौर हा महायुतीतील नेत्यांशी चर्चा करूनच ठरणार आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जो फॉर्म्युला असेल, तोच आताही असू शकतो. महायुतीत अजूनही एकी आहे. तेथे सर्वांच्या मताने निर्णय घेतले जातात. त्यामुळे महापौरपदाचे नावही सर्वानुमते निश्‍चित होईल. अद्याप आरक्षण जाहीर झालेले नाही. आरक्षण जाहीर झाल्यावर यासाठी जोरदार हालचाली होतील. सध्या केवळ चर्चाच आहेत’

दरम्यान, महापौर पद शिवसेनेला मिळण्यासाठी तुम्ही काँग्रेससोबत जाणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे, असे विचारता आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘आम्ही महायुती म्हणून लढलो आहे. महायुती म्हणूनच पाच वर्षे कार्यरत राहणार आहे. महापौर कोणाचा होईल, हे महायुतीच्या चर्चेतून ठरेल. शिवसेनेचा महापौर करण्यासाठी काँग्रेससोबत जाणे शक्य नाही. आम्ही काँग्रेससोबत कधीही युती करणार नाही. महायुतीतसुद्धा शिवसेनेला महापौरपद मिळेल. त्यामुळे महापौर पदासाठी काँग्रेस सोबत जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. अशा चर्चांना काहीच अर्थ नाही.’

काय म्हणाले होते सतेज पाटील?

सतेज पाटील यांनी, पडद्यामागं नेमकं काय सुरू आहे. याची खुली चर्चा करता येत नाही. काँग्रेस (३४) आणि शिंदेंची शिवसेना (१५) एकत्र आल्यास कोल्हापुरात सत्ता स्थापन होवू शकते. सध्या पडद्यामागे जोरदार राजकीय घडामोडी सुरू असून सगळ्याच गोष्टी आपण जाहीर करू शकत नाही असेही त्यांनी म्हटलं होतं. यानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून सतेज पाटील हे पुन्हा महाडिकांना धोबीपछाड देऊ शकतात अशी खमंग चर्चा रंगली होती.

FAQs :

1) कोल्हापुरच्या महापौर पदावर वाद का निर्माण झाला?
सतेज पाटील यांच्या सूचक विधानामुळे बॅक डोअर चर्चांची शक्यता व्यक्त झाल्याने वाद निर्माण झाला.

2) सतेज पाटील यांनी नेमकं काय विधान केलं?
बॅक डोअरवर सुरू असलेल्या चर्चा फ्रंटवर कशाला करायच्या, असे सूचक विधान त्यांनी केले.

3) शिवसेनेची या प्रकरणावर काय भूमिका आहे?
शिवसेना काँग्रेससोबत महापौरपदासाठी कधीच जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

4) महापौरपदाचा निर्णय कोण घेणार?
महायुतीतील सर्व पक्षांच्या एकीने पुढील पाच वर्षांचा महापौर ठरवला जाईल.

5) भाजपची प्रतिक्रिया काय आहे?
या घडामोडींनंतर भाजपमध्ये धाकधूक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT