Mumbai Mayor Election : महापौर पदासाठी शिंदेंचे दबावाचे राजकारण, उद्धव ठाकरे थेट भाजपला मदत करणार?

BJP BMC Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे महापौर पदासाठी आग्रही असताना ठाकरे थेट भाजपला छुपी मदत करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : एकनाथ शिंदे हे मुंबईत अडीच वर्षासाठी महापौरपद मिळावेत म्हणून आग्रही आहेत. त्यांनी आपल्या नगरसेवकांना हाॅटेलवर मुक्कामी ठेवले आहेत. प्रशिक्षणासाठी नगरसेवकांना तेथे आणले आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, यातून शिंदे दबावाचे राजकारण करू पाहत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान,शिंदेंच्या मदतीशिवाय भाजपचा महापौर होऊ शकणार नाही. त्यामुळे शिंदेंच्या काही मागण्या भाजप मान्य करण्याची शक्यता वर्तवली जात असताना ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारी आहेत.

ज्या प्रमाणे 2017 ला भाजपने महापौर निवडणूकीत सभात्याग करून अप्रत्यक्ष शिवसेनेला मदत केली होती. त्याच प्रमाणे ठाकरेंचे नगरसेवक देखील महापौर निवडणुकीच्या वेळी सभागृह त्याग करण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सभागृहाची सदस्यसंख्या कमी होऊन त्याचा थेट फायदा भाजपला होणार आहे. या विषयीचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
Mayor Election 2026 : उद्धव ठाकरेंचे तीन नगरसेवक फुटले? एकनाथ शिंदेंचा भाजपला चेकमेट, महापौरपद फिक्स?

एकनाथ शिंदेंना दिल्लीतून चावी

भाजपसाठी एकनाथ शिंदे हे लोहपुरुष आहे. कारण त्यांनी शिवसेना फोडली ना.अमित शाह हे शिंदेंना दिल्लीत खांद्यावर घेऊन फिरतात. तेच शिंदे 29 नगरसेवकांवर महापौरपदावर दावा सांगत आहेत. कारण फडणवीसांना रोखण्यासाठी त्यांना दिल्लीतून चावी दिली जात असल्याचा दावा, संजय राऊत यांनी केला.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
ZP Elections Maharashtra 2026: झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादीला ‘नो एन्ट्री’; अजितदादांच्या आमदाराला भेगडे यांनी करुन दिली जुन्या विधानाची आठवण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com