Mumbai Mayor Election : 'भाजपकडून ताज लँड्समधील शिंदेंच्या नगरसेवकांचे फोन टॅपिंग अन् स्वत:च्या नगरसेवकावरही वॉचडॉग...'

Sanjay Raut on Mumbai Mayor Election : 'राज्यात महापालिका निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार याची उत्सुकता अनेकांना आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले महापौर मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवल्याने महापौर निवडीत मोठा ट्विस्ट आला आहे.'
Eknath Shinde, Amit Shah, Sanjay Raut
Eknath Shinde, Amit Shah, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 20 Jan : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांतर आता महापौर कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर राज्यात महापालिका निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार याची उत्सुकता अनेकांना आहे.

अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले महापौर मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवल्याने महापौर निवडीत मोठा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे आता मुंबईचा महापौर भाजपचा की महायुतीचा? असा सवाल उपस्थित केला आहे.

मुंबईत सुरू असलेल्या याच सर्व राजकीय घडामोडींवर भाष्य करताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर वॉचडॉग ठेवले असून भाजप आपल्याच नगरसेवकांचे फोन टॅप करत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

Eknath Shinde, Amit Shah, Sanjay Raut
BJP News : नागपूरमध्ये भाजपचे नगरसेवक एकमेकांवर तुटून पडले.. राड्यानंतर प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत!

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर वॉचडॉग ठेवलेत. नगरसेवकांवर लक्ष ठेवलं जात आहे. ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात आहे. ते काय करतात, कुठे जातात यावर लक्ष ठेवलं जातंय. शिवाय आता जे ताज लँड्समध्ये कैदखान्यात असणाऱ्या नगरसेवकांचेही फोन टॅप होतायत. रश्मी शुक्ला नसल्या, तरी प्रक्रिया तीच आहे. भाजपा आपल्या स्वत:च्याच नगरसेवकांचे फोन टॅप करत आहे."

यावेळी मुंबईच्या महापौरपदा संदर्भात बोलताना राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. "मुंबईचा महापौर कोण होणार हे दिल्लीतून ठरवलं जाईल. आत्तापर्यंतच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं. महापौर ठरवण्यासाठी शिंदेंच्या लोकांना दिल्लीच्या पायाशी जाऊन बसावं लागतंय हा महाराष्ट्राचा अपमान आहे."

Eknath Shinde, Amit Shah, Sanjay Raut
Nashik Municipal Election : महापालिका निवडणुकीतील पराभवाने शिवसेनेची गणिते बिघडली, शिंदेंच्या शिलेदाराने व्यक्त केली "ती" सल!

दरम्यान, सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत देखील आहे. यावरूनच राऊतांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, 'दावोसमध्ये गुंतवणुकीवर कमी आणि उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात मुंबईच्या महापौराबाबतच जास्त चर्चा चालू असते.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com