Sharad Koli addressing media in Kolhapur, criticizing BJP ministers Nitesh Rane and Gopichand Padalkar over divisive Hindutva politics. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Koli : 'भाजप, काँग्रेस की RSS? नितेश राणे कुणाची पैदास..., हाफ चड्डीवाल्यांना शिव्या घालणारे संघाला चालतात का?' ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल

Sharad Koli Criticizes Nitesh Rane : 'मला नितेश राणेंना सांगायचा आहे की, तुम्ही मशिदीत जाऊन झाडून काढणार आहे का? तुम्हाला हिंदुत्वाचा एवढा पुळका आलाय तर दर्ग्यात जाऊन चादर का पांघरली? त्यावेळेस तुम्ही मुसलमान समाज स्वीकारला होता का? मुसलमान समाज तेव्हा तुम्हाला प्यारा होता, आता तुम्हाला दुश्मन दिसतोय का?'

Rahul Gadkar

Kolhapur News, 16 Oct : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते शरद कोळी यांनी भाजप मंत्री नितेश राणे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. नितेश राणे भाजपचा सालगडी म्हणून काम करतोय.

तो कुठलाही हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या तोंडावर हिंदू-मुस्लिमांची डोकी भडकवून जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवायची आहे, अशा शब्दात शरद कोळी यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

माध्यमांशी संवाद साधताना शरद कोळी म्हणाले, मला नितेश राणेंना सांगायचा आहे की, तुम्ही मशिदीत जाऊन झाडून काढणार आहे का? तुम्हाला हिंदुत्वाचा एवढा पुळका आलाय तर दर्ग्यात जाऊन चादर का पांघरली? त्यावेळेस तुम्ही मुसलमान समाज स्वीकारला होता का? मुसलमान समाज तेव्हा तुम्हाला प्यारा होता.

आता तुम्हाला दुश्मन दिसतोय का? असे सवाल करत नितेश राणेंनी हिंदुत्वाच्या नावावर बाजार मांडलेला आहे. राणे हे हिंदुत्वाच्या नावावर हिंदूंच्या टाळ्यावरचं लोणी खाणारा बोका आहे, अशा बोचऱ्या शब्दात कोळी यांनी राणेंवर टीका केली.

तसंच यावेळी त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, हे दोघं डोंबाऱ्याचे अवलाद असून भाजपने चावी दिल्यावर हे अंगावरचे कपडे काढून नाचकाम करतील. अख्या महाराष्ट्राला कळून चुकले की यांना जातीजातीत तेढ निर्माण करायचं आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी नितेश राणे नेमका भाजप की काँग्रेस की आरएसएस, राजकारणातील कुणाची पैदास आहे माहिती नाही. हेच नितेश राणे ते हाफ चड्डीवाल्यांना शिव्या घालत होते. ज्या आरएसएसला मंत्री नितेश राणे शिव्या घालत होते, त्या आरएसएसला आता हे नितेश राणे चालतात का? असा सवालही कोळी यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT