Rajya Sabha Election : धक्कादायक : राज्यसभा निवडणुकीसाठी 10 आमदारांच्या बोगस सह्या; पक्षाच्या अध्यक्षाला अटक, भाजपशी कनेक्शन?

Navneet Chaturvedi Arrested for Fake Signatures Case : नवनीत चतुर्वेदी यांच्या अटकेवरून मंगळवारी पंजाब आणि चंदीगढ पोलीस आमनेसामने आले होते. हे प्रकरण थेट कोर्टापर्यंत पोहचले होते.
Janata Party President Navneet Chaturvedi arrested in connection with fake signatures of AAP MLAs in the Punjab Rajya Sabha elections; BJP link alleged.
Janata Party President Navneet Chaturvedi arrested in connection with fake signatures of AAP MLAs in the Punjab Rajya Sabha elections; BJP link alleged.Sarkarnama
Published on
Updated on

Impact of the Arrest on Rajya Sabha Polls : भारतीय निवडणूक आयोगाकडून काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पंजाबमधून जनता पक्षाचे अध्यक्ष नवनीत चतुर्वेदी यांनी कथितपणे दहा आमदारांच्या बोगस सह्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनी या सह्यांसह निवडणूकीसाठी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.

पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या बोगस सह्या करण्यात आल्या आहेत. या आमदारांनी हा प्रकार समोर आल्यानंतर चतुर्वेदी यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यानंतर बुधवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे. चतुर्वेदी यांना भाजपचे पाठबळ असल्याचा आरोप आपने केला आहे. त्यामुळे पंजाबमधील राजकारण चांगलेच तापले आहे.

आपच्या 70 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा चतुर्वेदी यांनी केला होता. तशा बातम्याही प्रसिध्द झाल्या. त्यांनी सोशल मीडियातूनही ही माहिती दिली. पण आपच्या आमदारांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर चतुर्वेदी यांची पोलखोल झाली. पोलिसांनी तातडीने चतुर्वेदी यांच्यावर गुन्हे दाखल केले.

Janata Party President Navneet Chaturvedi arrested in connection with fake signatures of AAP MLAs in the Punjab Rajya Sabha elections; BJP link alleged.
Bihar Election 2025: माझी काय चूक? पक्षश्रेष्ठींनी सांगावं; टिकीट कापल्यावर महिला आमदाराला अश्रु अनावर!

दरम्यान, चतुर्वेदी यांच्या अटकेवरून मंगळवारी पंजाब आणि चंदीगढ पोलीस आमनेसामने आले होते. हे प्रकरण थेट कोर्टापर्यंत पोहचले होते. पंजाब पोलीस चतुर्वेदी यांना अटक करण्यासाठी चंदीगढ येथे गेल्यानंतर चंदीगढ पोलिसांनी त्यांना रोखले. अनेक तास पंजाब पोलीस अटकेसाठी प्रयत्न करत होते. पंजाबमधील रोपड येथील न्यायालयाने चंदीगढ पोलिसांना याबाबत नोटीस पाठपत नवनीत यांनी पंजाब पोलिसांच्या हवाली करण्याचे आदेश बजावले.

रोपड न्यायालयाच्या नोटिशीनंतर चंदीगढ पोलिसांनी नवनीत यांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले. या वादावरून आपने थेट भाजपवर आरोप केले आहेत. भाजप आधी चंदीगढ महापौर निवडणूक चोरी करताना पकडले गेले आणि आता थेट राज्यसभा निवडणूक चोरी करण्यापर्यंत मजल गेल्याचा आरोप आपने केला आहे.

Janata Party President Navneet Chaturvedi arrested in connection with fake signatures of AAP MLAs in the Punjab Rajya Sabha elections; BJP link alleged.
Maharashtra Politics : 'योजना 'चालू', लाभ शून्य! स्थानिकच्या निवडणुकीत फडणवीस सरकारचा समाचार घ्यायला हवा...'

आमदारांच्या बनावट सह्या करून राज्यसभेची निवडणूक चोरी करण्याचा भाजपचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. दोन दिवस भाजपने चंदीगढ पोलिसांच्या माध्यमातून नाटक केले. संपूर्ण यंत्रणेची खिल्ली उडवली. खोट्या सह्या करणाऱ्याला वाचविण्यासाठी संपूर्ण चंदीगढ पोलीस तुटून पडली होती, त्याला पोलीस ठाण्यात सुरक्षितपणे ठेवण्यात आले. पण आता खोट्या सह्या करणारा पंजाब पोलिसांच्या अटकेत आहे, अशी टीका आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी केली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com