Shivsena UBT district chief Ravikiran Ingawale warns MVA leaders, demanding 33 seats in Kolhapur civic polls and signalling readiness to contest independently if sidelined. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena UBT : मातोश्री अन् शिवसैनिकांना गृहीत धरू नका! जागांचा आकडा सांगत कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखांनी थोपटले दंड

Shivsena UBT : कोल्हापूर मनपा निवडणुकीत 33 जागांची मागणी करत ठाकरे सेनेने महाविकास आघाडीला कठोर इशारा दिला आहे. स्वतंत्र लढण्याची किंवा पर्यायी आघाडीची तयारी असल्याचे जिल्हाप्रमुखांनी स्पष्ट केले.

Rahul Gadkar

Shivsena UBT : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील नेत्यांनी 'मातोश्री'ला आणि मातोश्रीच्या शिवसैनिकांना गृहीत धरू नये. येणाऱ्या निवडणुकीत समन्वयाने मध्यमार्ग काढून जागा वाटपात अपेक्षित स्थान द्यावे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिथं प्राबल्य आहे, अशा ठिकाणी जागा मिळाव्यात. 81 पैकी 33 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांसाठी मिळाव्यात, अन्यथा वरिष्ठांना कल्पना देवून स्वबळावर अन्यथा इतर पक्षांसोबत आघाडी करून महानगरपालिका निवडणूक लढवू अशा इशारा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे होती. मात्र काँग्रेसने ही जागा आपल्याकडे घेऊन त्या ठिकाणी श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी दिली. विधानसभा निवडणुकीत देखील आमच्याकडून जागा घेतली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला शिवसैनिकांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला. मात्र नेहमीच ठाकरेच्या शिवसेनेला गृहीत धरण्यात आला आहे. केवळ निवडणुकीला आमचा उपयोग होत आला आहे.

महाविकास आघाडीतील आमदार, खासदारांकडे निधी मागितल्यावर आम्हाला निधी दिला जात नाही. महायुतीचे नेते आमच्या दारात येऊन नारळ फोडून जातात. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून आम्हाला विचारणा होत आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत आम्हाला गृहीत धरू नका असा इशारा महाविकास आघाडीला दिला आहे.

मालोजीराजे आमचा फोन उचलत नाही.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही आणि आमच्या शिवसैनिकांनी (Shivsena) दारोदार फिरून प्रचार केला आहे. मात्र आमच्या कामानिमित्ताने आम्ही मालोजीराजे छत्रपती यांना 50 फोन केले. त्यांनी आमचा एकही फोन रिसीव केला नाही. निवडणुका जवळ आल्या की रवी हे कर, रवी तिथे जा, असे निरोप येतात. मातोश्रीचा आदेश पाळत आम्ही ते काम करत राहतो. मात्र निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून शिवसैनिकांना न्याय मिळत नसल्याची भूमिका जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT