Kolhapur election crime: कोल्हापूरमधील संतापजनक घटना; सासरा निवडणुकीला उभा, खर्चासाठी 10 लाखांचा तगादा; सुनेनं जीवन संपवले

family pressure election expenses News : कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे धक्कादायक प्रकार घडला आहे.
Kousar gargre
Kousar gargre Sarkarnama
Published on
Updated on

Kolahapur news : कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. 'सासर्‍याच्या निवडणूक खर्चाला माहेरहुन दहा लाख रुपये घेऊन ये', असा तगादा लावल्यामुळे विवाहितेने आपले जीवन संपवले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घडलेल्या प्रकारानंतर पती इंजमाम राज महंमद गरगरे व समीना इलाहान गरगरे यांच्यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. न्यायालयात हजर केला असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर सासू मुमताज गरगरे आणि सासरा राज महंमद गरगरे यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र गुन्हा गंभीर असल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. त्यानंतर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कौसर गरगरे यांनी 10 नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. टीईटी परीक्षेचा अभ्यास होत नसल्याचे कारण पुढे करत ही आत्महत्या झाल्याचा जबाब पोलीस वर्दीमध्ये नोंदवण्यात आला होता.

Kousar gargre
BJP major decision : 'स्थानिक'च्या निवडणुकीपूर्वीच भाजप मोठा निर्णय घेणार; CM फडणवीसांनीच दिले संकेत,अनेक नेत्यांच्या पोटात गोळा

या संपूर्ण प्रकरनानंतर कौसरच्या माहेरच्या नातेवाईकांनी घटनेबाबत शंका उपस्थित केली होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबात वाद देखील निर्माण झाला होता. घातपात केल्याच्या संशयावरून कौसरच्या माहेरील मंडळींनी मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

Kousar gargre
NCP SP Politics : शरद पवारांच्या पक्षाकडून अजित पवारांचे नाव घेत कोट्यावधींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप

या संपूर्ण प्रकरणानंतर कौसर याचा भाऊ अल्ताफ आवटी यांनी सासू, सासरा, पती आणि जाऊ यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. दिलेल्या फिर्यादीनुसार इंजमाम गरगरे यांच्या व्यवसायासाठी आणि सासरे राज महंमद गरगरे यांच्या निवडणुकीच्या खर्चासाठी माहेर होऊन दहा लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला होता.

Kousar gargre
Congress Leader News : युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भावाचा पालिका निवडणुकीत राजकीय गेम...कोणी फिरवली सूत्रे?; चर्चांना उधाण

यासाठी कौसर हिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता. या त्रासाला कंटाळूनच कौसर हिने आत्महत्या केल्याची फिर्याद तक्रारदाराने दिली आहे. या प्रकारानंतर पती इंजमाम राज महंमद गरगरे व समीना इलाहान गरगरे यांच्यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. न्यायालयात हजर केला असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

Kousar gargre
NCP SP Politics : शरद पवारांच्या पक्षाकडून अजित पवारांचे नाव घेत कोट्यावधींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com