Satej Patil-Shoumika Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Video-Satej Patil : शौमिका महाडिक केवळ TRP साठी गोंधळ घालतात; त्यांचं दुःख वेगळंच; सतेज पाटलांचा पलटवार

Gokul Dudh Sangh Annual Meeting : त्या संचालिका आज आंदोलन करत आहेत, त्या 70 टक्के बोर्ड मिटींगला आलेल्या नाहीत. त्या नंतर येऊन सह्या करतात. एवढंच प्रेम आहे, तर त्यांनी बोर्ड मिटिंगला आलं पाहिजे.

Rahul Gadkar

Kolhapur, 30 August : त्या महिला संचालिका केवळ टीआरपीसाठी गोंधळ घालत आहेत. ‘गोकुळ’च्या सभासदांचे त्यांना दुःख नाही, तर ‘गोकुळ’मधील त्यांचे टँकर बंद झाले, हे त्यांचे दुःख आहे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला.

गोकुळ दूध संघाची (Gokul Dudh Sangh ) आज 62 वी सर्वसाधारण वार्षिक सभा झाली. त्या सभेत विरोधकांना बसायला जागा दिली नाही, तसेच इतर मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले, त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सत्ताधारी गटाचे नेते सतेज पाटील यांनी यांनी शौमिका महाडिक यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

‘त्या’ महिला संचालिका केवळ टीआरपीसाठी गोंधळ घालत आहेत. त्या संचालिका आज आंदोलन करत आहेत, त्या 70 टक्के बोर्ड मिटींगला आलेल्या नाहीत. त्या नंतर येऊन सह्या करतात. एवढंच प्रेम आहे, तर त्यांनी बोर्ड मिटिंगला आलं पाहिजे. सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून केवळ प्रसिद्धी मिळवायचे काम केले जात आहे, असा आरोपही सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला.

सतेज पाटील म्हणाले, गोकुळच्या सभासदांचे त्यांना दुःख नाही, गोकुळमधील त्यांचे टँकर बंद झाले, हे त्यांचे दुःख आहे. या दुखापोटीच त्यांचं हे आंदोलन सुरू आहे.

पशूवैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भातही आमदार सतेज पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, राज्य सरकारने मदत केली तरच हे महाविद्यालय सुरू केले जाईल, असे गोकुळ दूध संघाच्य अध्यक्षांनी जाहीरपणे सांगितले आहे. कोणत्या संस्थेला हे महाविद्यालय चालवायला दिले जाणार नाही.

आजच्या सभेत केवळ खोटे बोलायचे इतकच आहे. लोकांच्या पर्यंत जाण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे त्यांचा विरोध सुरू आहे. लोकांनी आमच्यावर गोकुळ दूध संघाची जबाबदारी दिली आहे. आगामी काळातही त्यांना ही जबाबदारी मिळणार नाही; म्हणून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे.

त्यांच्या खोट्या प्रचाराला गोकुळ दूध संघाचे सभासद भूलणार नाहीत. आम्हाला सभा चालवायची होती, त्यांना गोंधळ घालून सभा संपवायची होती, असा पलटवारही सतेज पाटील यांनी शौमिका महाडिक यांच्यावर केला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT