Babanrao Shinde : राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; माढ्यात मुलाला संधी देणार

Assembly Election 2024 : माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबनराव शिंदे हे सलग सहा वेळा निवडून आले आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात दाखल झाले होते.
Ranjeetshinh Shinde-  Babanrao Shinde
Ranjeetshinh Shinde- Babanrao ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 30 August : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बबनदादांनी आपले पुत्र तथा सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवतील, असे म्हटले आहे. त्यामुळे विधानसभेच्या आखाड्यात माढ्यातून या वेळी बबनराव शिंदे नसणार हे आता स्पष्ट झाले आहे.

माढा विधानसभा मतदारसंघातून (Madha Assembly Constituency) आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) हे सलग सहा वेळा निवडून आले आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात दाखल झाले होते. गेल्या काही दिवसांपासून आमदार बबनराव शिंदे हे निवडणूक लढवणार नाहीत, अशी कुजबूज सुरू होती. त्यावर खुद्द बबनदादांनीच पडदा टाकला आहे.

पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील एका कार्यक्रमामध्ये बोलताना आमदार शिंदे यांनी हे संकेत दिले आहेत. पंढरपूर तालुक्यातील चाळीसपेक्षा जास्त गावे ही माढा मतदारसंघासाठी जोडलेली आहेत. त्या गावांत आल्यानंतर बबनदादांनी निवडणूक न लढविण्याचे संकेत दिले आहेत.

‘आगामी विधानसभेची निवडणूक मी लढवेन की नाही यामध्ये शंका आहे. रणजित भैयाला एकवेळा संधी द्या. पाच वर्षांत काय काम होतं. काय नाही, हे बघा. पाच वर्षांत ते तुमच्या विश्वासाला उतरले नाहीत, तर पाच वर्षांनंतर येणाऱ्या निवडणुकीत निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात आहे, असेही बबनराव शिंदे यांनी म्हटले आहे.

Ranjeetshinh Shinde-  Babanrao Shinde
Barshi Bazar Samiti : राजेंद्र राऊतांचा सेना-राष्ट्रवादीला छोबीपछाड; भावाच्या हाती सत्ता देत बार्शी बाजार समिती एकहाती राखली

मी सुरुवातीला असंच अपक्ष निवडणुकीला उभा होतो. त्यानंतर सलग सहा वेळा चढत्या मताधिक्याने निवडून आलो. कारण, विकास कामांमुळे मी निवडून आलो, असेही बबनराव शिंदे यांनी स्पष्ट केले.

आमदार बबनराव शिंदे हे 1995 पासून सलग सहा वेळा माढा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. बबनराव शिंदे यांनी पहिल्यांदाच उघडपणे आपल्या पुत्रासाठी मतं मागायला सुरुवात केली आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनीही माढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत अभिजीत पाटील यांच्याविरोधात प्रत्यक्ष बबनदादा शिंदे उतरणार की रणजितसिंह शिंदे यांना मैदानात उतरवणार याची उत्सुकता आहे.

Ranjeetshinh Shinde-  Babanrao Shinde
Mohol Politics : राजन पाटलांच्या गोटात काय शिजतंय? मानेंचा सुळेंसोबत प्रवास, तर जयंतरावांचा पाटलांना फोन

रणजित शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविणार की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार, याची उत्सुकता लागली आहे. मात्र, शिंदे यांच्यासाठी विधानसभेची आगामी निवडणूक सोपी असणार नाही, हेही तितकेच खरे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com