आगामी विधानसभा निवडणुकीला अवघा 60 दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या आखाड्यात शड्डू ठोकला आहे. कोणत्या मतदारसंघावर कुणाचा दावा त्याच्या चर्चा आता गाव चावडीवर होऊ लागल्या आहेत. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात महाविकास व महायुतीच्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याचे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
महाविकास आघाडी आणि काँग्रेसमधील जागा वाटपाच्या समितीत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस किती जागांवर लढणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. जिल्ह्यातील दहा पैकी किती जागांवर काँग्रेस लढणार या प्रश्नावर बोलण्यासाठी मात्र सतेज पाटील (Satej Patil) यांनी स्पष्ट नकार दिला आहे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून जिल्ह्यातील दहा जागा आम्ही लढणारच आहोत. कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला याबाबत संयुक्तिक पणे उघड चर्चा करणार नाही. जागा वाटपातील चर्चेतील मी महत्त्वाचा घटक आहे. त्यावर आताच काय बोलणार नाही. त्या विषयावर बोलून आताच वादाला तोंड फोडणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त करून दाखवली.
जिल्ह्यातील किती जागा काँग्रेसला (Congress) घ्यायच्या हे मी महाविकास आघाडीच्या बैठकीत माझं मत मांडेन. काँग्रेसच्या जागा निवडून आणण्याचा माझा प्रयत्न असेलच पण जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न असणार असल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील काही जागांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची रस्सीखेच सुरू आहे. सध्या काँग्रेसकडे विद्यमान चार विधानसभा मतदारसंघ आहेत. तर राष्ट्रवादीचे दोन विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत गेल्याने पारंपारिक पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाने कागल,चंदगड, राधानगरी-भुदरगड या विधानसभा मतदारसंघासह कोल्हापूर उत्तर आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाटेला असणारी जागा काँग्रेसला सोडल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता या दोन नवीन मतदारसंघासाठी आक्रमक झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.