aaditya thackeray shrikant shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shrikant Shinde On Aditya Thackeray : शिव्या शाप देण्याशिवाय आदित्य ठाकरेंनी काय केलं, श्रीकांत शिंदेंनी डागली तोफ !

Kolhapur Lok Sabha Constituency : कल्याणमध्ये राज ठाकरे साहेबांनी सभा घेतली तर आम्हाला आनंद होईल. कल्याणमध्ये मनसेची ताकद मोठी.

Rahul Gadkar

Kolhapur News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीकांत शिंदे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज कल्याणमध्ये रोड शो होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी कडक शब्दांत त्यांच्यावर तोफ डागली.

कल्याणमध्ये आम्हीच जिंकणार आहोत. निवडणूक आहे म्हटल्यावर रोड शो सगळे करणार. कल्याणमध्ये आपल्याला कल्याणाचे नागरिक मोठ्या संख्येने निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदित्य ठाकरे मृगजळातून बाहेर आले नाहीत. दोन वर्षांपासून ते शिव्या शाप देत आहेत, पण लोकांना माहिती आहे कोण कामाचे आहे, अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला. पत्रकार परिषद घेत मंगळवारी त्यांनी आपली भूमिका मांडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आदित्य ठाकरे बोलतात ते स्वतःसाठी बोलतात, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जनतेसाठी काम करतात, अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी समाचार घेतला. कोल्हापुरात शनिवार पेठेतील शिवालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार धैर्यशील माने, राज नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर या वेळी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. धैर्यशील माने यांनी केलेल्या कामावर नागरिक खूष आहेत. प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम माने आणि मंडलिक यांनी केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 2-0 असा गोल झाला आहे, असा टोलाही श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला.

रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीवर बोलताना, खासदार शिंदे म्हणाले, ठाणे, पालघर, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर इथं महायुतीचे उमेदवार निवडून येतील. या सगळ्या जागांवरील उमेदवार नावाची घोषणा आज-उद्या होईल. सगळ्यांची उत्सुकता अधिक दिवस राहणार नाही. कल्याणमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray ) साहेबांनी सभा घेतली तर आम्हाला आनंद होईल. कल्याणमध्ये मनसेची ताकद मोठी आहे. आम्ही राज ठाकरे साहेबांना सभेसाठी विनंती करणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांना निवडणुकीसाठी जो प्रचार करावा लागतो ते एकनाथ शिंदे करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचेदेखील कोल्हापूरवर प्रेम आहे. त्यामुळे ते कोल्हापुरात थांबून भेटीगाठी घेत आहेत. शिंदे यांचे हे प्रेम निवडणुकीपुरते नाही, तर विकासासाठी त्यांनी मोठा निधी दिला आहे. कोल्हापुरात भावनिक आवाहन करून मते मागितली जातील, पण नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावे, असे आवाहनदेखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.

(Edited by : Chaitanya Machale)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT