Vijay Auti & Ganesh Shelke
Vijay Auti & Ganesh Shelke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पारनेरमधील शिवसेनेत गटबाजी उफळण्याची चिन्हे : औटींच्या इशाऱ्याने शिवसैनिक अस्वस्थ

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ( जि. अहमदनगर ) - लोकसभा निवडणुकीपासून पारनेर तालुक्यातील राजकीय गणिते वेगात बदलत आहेत. यात शिवसेनेत मोठी राजकीय अस्वस्थता आहे. ही राजकीय अस्वस्थता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कळीचा मुद्द ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यात आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) व माजी आमदार विजय औटी ( Vijay Auti ) यांच्या सत्ता संघर्षाला नवी वळण मिळण्याची चिन्हे आहेत. ( Signs of factionalism erupting in Shiv Sena in Parner: Shiv Sainiks upset over Auti's gesture )

आमदार नीलेश लंके पारनेरमध्ये वर्चस्व निर्माण करीत असताना शिवसेना मात्र गतबाजीत खोलवर रुतत असल्याचे वास्तव समोर येत आहे. अंतर्गत कलह उफळण्याची चिन्हे असतानाच माजी आमदार व पक्षाचे जेष्ठ नेते विजय औटी यांनी जाहीरपणे पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांवर आगपाखड केल्याने सेनेतील सुंदोपसुंदी वेगळ्या दिशेने जात असल्याचे दिसते. याला वेळीच आवर घातला नाही तर सेनेला कम बॅक करण्यात अडचणी येतील.

पारनेर तालुक्यातील सुपे येथे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी आमदार विजय औटी यांनी केलेल्या वक्तव्याने थेट पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांना पक्षातून हकालपट्टीचा इशारा दिला आहे. या वक्तव्याने तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू असुन अनेक वर्ष एकसंघ असलेल्या शिवसेनेमध्ये औटी यांच्या वक्तव्याने फुट पडते काय? अशी चर्चने तालुक्यात जोर धरला आहे.

पक्षातील श्रेष्ठींनी यामध्ये लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. पारनेर तालुक्यामध्ये मागील 15 वर्षे शिवसेना शिवसैनिकांच्या बळावर सत्तेत होती. दर निवडणुकीमध्ये शिवसेनेतूनच बाहेर पडलेल्या आमदार नीलेश लंके यांनी शिवसेनेचा विजय रथ थोपविल्यानंतर पक्षामध्ये शांतता निर्माण झाली होती. त्यानंतर शिवसेनेमध्ये पक्षीय बलाबल नसतानाही सभापती गणेश शेळके यांनी खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जाऊन संख्याबळाचा अकडा जुळवला व सत्ता ताब्यात घेतली.

तालुक्यातील अनेक विकासकामांना पंचायत समितीच्या माध्यमातून निधी देऊन कार्यकर्त्यांना पाठबळ दिले गेले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काशिनाथ दाते यांनाही जिल्हा परिषदमध्ये बांधकाम व कृषी समितीची जबाबदारी मिळाल्याने पक्षाची ताकद अजुन वाढली होती मात्र हे सर्व होत असताना औटी यांचे पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कानपिचक्या देणे सुरूच होते. त्याची खदखद या शिवसंपर्क अभियानात मोठ्या प्रमाणात औटी बोलण्यातून समोर आली. शिवसेनेत अंतर्गत गृहकलह सुरू असल्याचे समोर आले.

लंकेचा कित्ता औटी पुन्हा गिरवणार का?

चार वर्षांपूर्वी तत्कालीन तालुकाप्रमुख नीलेश लंके यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तसाच प्रकार पुन्हा एकदा दोन वेळेस सभापती राहिलेले गणेश शेळके यांच्याबाबत होणार का अशी चर्चा शिवसेनिकांमध्ये सुरू आहे.

मागील दहा वर्षे मी शिवसेनेशी एकनिष्ठ राहुन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काम केले आहे. या पुढेही ते करणार आहे.सभापती पदाच्या माध्यमातून शिवसैनिकांना ताकद दिली.

- गणेश शेळके, सभापती, पारनेर पंचायत समिती.

सभापती गणेश शेळके यांच्या हकालपट्टी बाबत कोणीही लेखी तोंडी तक्रार केली गेलेली नाही. हाकलपट्टी होणार असल्याचे वृत्त समाज माध्यमांद्वारे प्रसारित करून कोणी तरी खोडसाळपणा सभापती शेळके यांच्याबाबत करत आहे.

- रामदास भोसले ( उपजिल्हाप्रमुख ), विकास रोहकले ( तालुका प्रमुख)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT