Ram Satpute  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ram Satpute : मोहिते पाटलांच्या विरोधात सोलापुरातील नेत्यांचा संकल्प : माजी आमदार राम सातपुतेंनी केला भरसभेत दावा

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यावर टीका करत जिल्ह्यातील नेते एकत्र आल्याचा दावा केला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 June : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने माळशिरसचे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटील यांच्यावर तोफ डागली आहे. विधान परिषदेची निवडणूक पुन्हा लढवायची हिम्मत झाली नाही, अशा प्रकारची वेळ मोहिते पाटील यांच्यावर आणायची, असा संकल्प सोलापूर जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी केला आहे, असा दावा सातपुते यांनी केला आहे.

भाजप-महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत राम सातपुते बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत मोहिते पाटील यांचा पराभव करायचाच, असा निर्धारही राम सातपुते यांनी बोलून दाखवला.

ते म्हणाले, माजी आमदार राजेंद्र राऊत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हक्काचा माणूस आहेत. मोहिते पाटील यांचा पराभव करून राजेंद्र राऊत यांना आपल्याला मोठ्या फरकाने विधान परिषदेवर पाठवायचे आहे.

मोहिते पाटील यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची हिम्मत केली नाही पाहिजे, असा संकल्प आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, दोन्ही देशमुख आणि आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. भाजपच्या विरोधात ह्यांची निवडणूक लढवण्याची हिम्मत झाली नाही पाहिजे, असा दारुण पराभव करण्याची वेळ आली आहे, असेही राम सातपुते म्हणाले.

माजी आमदार सातपुते म्हणाले, आपला विजय झालेला आहे, त्यामुळे राजाभाऊ आम्हाला तुमच्या सत्काराची वेळ द्या. अकलूजच्या विजय चौकात एवढा मोठा जल्लोष करू की हे पुन्हा निवडणूक लढवणार नाहीत, असे मी विश्वासाने सांगतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT