Rajendra Raut : अकलूजच्या चौकात सभा घेऊन मोहिते पाटलांना उत्तर देणार : डीसीसी बॅंकेच्या आरोपावरून राजेंद्र राऊत आक्रमक

Solapur DCC Bank Inquary Issue : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राजेंद्र राऊत यांनी मोहिते पाटील आणि दिलीप सोपल यांच्यावर विरोध केल्याचा आरोप करत निकालानंतर उत्तर देण्याचा इशारा दिला.
Dhairyasheel Mohite Patil-Rajendra Raut
Dhairyasheel Mohite Patil-Rajendra RautSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 07 June : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले‌; म्हणूनच मोहिते पाटील आणि आमदार दिलीप सोपल माझ्या विरोधात काम करत आहेत, असा आरोप महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केला. तसेच, निकालानंतर अकलूजच्या चौकात सभा घेऊन मोहिते पाटलांकडून होत असलेल्या आरोपाला जरुर उत्तर देणार आहे, असे चॅलेंज राऊत यांनी दिले आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची चौकशी लावल्याचा आरोप माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्यावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून होत आहे. त्याबाबत राऊत यांनी मोहिते पाटलांना चॅलेंज दिले आहे.

ते म्हणाले, शेतकऱ्यांची बॅंक वाचली पाहिजे, यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. अनेक संचालकांनी कर्ज घेतले आणि फेडलेसुध्दा. माजी आमदार राजन पाटील हेसुद्धा जिल्हा सहकारी बॅंकेचे (डीसीसी DCC Bank) संचालक होते. पण त्यांच्याकडे काही येणं आणि देणं नाही.

माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी सुरळीतपणे कर्जाची परतफेड केली आहे. संजयमामा शिंदे यांनीही भरलेले आहेत. जयवंतराव जगताप यांनी तर रुपयासुद्धा...ते माझे मार्गदर्शक आणि जीवाभावाचे आहेत, मला लहान भावासारखं मानतात. जे काही बॅंकेचे संचालक आहेत, ते सगळे आज आमच्यासोबत आहेत. आमच्या विरोधात कोण आहे, हे सांगावं, असा सवालही त्यांनी केला.

Dhairyasheel Mohite Patil-Rajendra Raut
Mohite Patil Vs Gore : ‘मोहिते पाटलांची उलटी गिनती सुरू झालीय; फडणवीसांच्या शब्दाचा अवमान करणाऱ्यांचा बदला घेणार’

राजेंद्र राऊत म्हणाले, आता माळशिरसचा आणि आमच्या बार्शीचा मुद्दा आहे. डीसीसी बॅंकेचा आणि विधान परिषदेच्या मतदानाचा काय संबंध आहे? सोसायटी मतदारसंघात माझं मतदान असावं; म्हणून मी दरवर्षी एक लाख रुपये कर्ज घेतो आणि ते भरतो. मी डीसीसी बॅंक आणि राष्ट्रीयकृत बॅंकेचे कर्ज घेतो आणि भरून टाकतो. प्रत्येकाला कर्ज घ्यावंच लागतं. सहकार जीवंत राहावा, यासाठी माझे प्रयत्न आहेत.

एखाद्या संस्थेला उद्‌ध्वस्त करणे हे चुकीचे आहे. जिल्हा बॅंकेत चुकीचं काम चाललं होतं, त्यामुळे त्याच्याविरोधात आवाज उठवला आणि कोर्ट कचेऱ्या केल्या. त्यामुळेच आज सोलापूर डीसीसी बॅंक सुरक्षित राहिली आहे. आज राष्ट्रीयकृत बॅंकेत शेतकऱ्यांना उभंही केलं जात नाही. पण डीसीसी बॅंक ही शेतकऱ्यांची हक्काची बॅंक आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

Dhairyasheel Mohite Patil-Rajendra Raut
MLC Election : जळगावात रेश्मा काळेंची माघार झाली तर नाशिकमध्ये गोकुळ गितेंना तलवार म्यान करावी लागणार?

माजी आमदार राऊत म्हणाले, बॅंकेच्याबाबत गैरसमज पसरविण्यात येऊ नये, ज्यांना कर्ज भरायचे नव्हते, त्यांना मी लावलेल्या चौकशीचा शॉक बसला आहे. आता बॅंकेच्या बाबत करण्यात येत असलेल्या आरोपाबाबत उत्तर द्यायला मला सध्या मर्यादा आहेत. निकालानंतर अकलूजच्या चौकात सभा घेऊन माझ्यावर होत असलेल्या आरोपाचे उत्तर जरुर देणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com