Mohite Patil Vs Gore : ‘मोहिते पाटलांची उलटी गिनती सुरू झालीय; फडणवीसांच्या शब्दाचा अवमान करणाऱ्यांचा बदला घेणार’

Solapur Vidhan Parishad Election 2026 : सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील गटावर अप्रत्यक्ष टीका करत राजकीय संघर्ष अधिक तीव्र केला आहे.
Jaykumar Gore-Dhairyasheel Mohite Patil
Jaykumar Gore-Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 07 June : सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील विशेषतः खासदार धैर्यशील मोहिते पाटील पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी संपलेली कुटुंब उभा करण्याचं काम केलं. त्या कुटुंबांनी देवेंद्रजींसोबत केलेली बेईमानी, त्यांनी टाकलेल्या शब्दाचा केलेला अवमान याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही, त्यांची आता उलटी गिनती सुरू झाली आहे, असा इशारा पालकमंत्री गोरे यांनी मोहिते पाटील यांचे नाव न घेता दिला.

महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारसभेत बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, काळ बदलला आहे, आता कोतवालसुद्धा नमस्कार घालत नाही. परिस्थितीत बदलली आहे. राज्य गेलंय पण थाट गेलेला नाही. हाताचा बोटावर मोजण्याइतकीच मतं गेली तर जातील अन्यथा जाण्यासारखी परिस्थिती नाही.

आता राहता राहिला अकलूजचा (Akluj) विषय, तर तिथंही आपण खातं उघडलं आहे. तिथंही आपलं मतदान आहे आणि काही अदृश्य शक्तीही आहेत. ते आपल्यासोबत काम करणार आहेत, असे सूचक विधानही गोरे यांनी केले.

ते म्हणाले, काही लोकांचं म्हणणं आहे की, लोकशाहीत आम्हाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. हे कोणी सांगावं. लोकशाहीची भाषा कोणी करावी. हरकत नाही, एवढंच सांगतो की, त्यांची उलटी गिनती सुरू झालेली आहे. कधी कधी विझताना दिवा मोठा होतो, तसं सध्याचे विरोधकांचं चित्र आहे.

विधान परिषदेची बिनविरोध होणारी ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचं उत्तर मतदार दिल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या दिवशी निकाल लागेल, त्याच दिवशी कोणाची गिनती १६ पासून सुरू झाली आहे. पण, आमचं गणित ५०० पासून पुढे चालू होईल, असं गोरे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात ६८.५ टक्के एकट्या भाजपची मतं

ते म्हणाले जिल्ह्यात ६८.५ टक्के मतं ही एकट्या भाजपची आहेत. उरलेल्या २२ टक्क्यांमध्ये आमचे सहकारी आहेत. अगदी ५ ते १० टक्क्यांचा विषय आहे. तेवढीचं मतं आज आपल्या समोर आहेत. अशा परिस्थितीमुळेच मी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन केले होते. पण काही लोकांना आपलं अस्तित्व संपण्याची भीती असते. त्यातून अस्तित्वाच्या लढाईसाठीच ही निवडणूक लावलेली आहे.

Jaykumar Gore-Dhairyasheel Mohite Patil
Ranjitsinh Mohite Patil : राजेंद्र राऊतांचं रणजितसिंह मोहिते पाटलांविषयी मोठं विधान : म्हणाले, ‘ते आता भाजपमध्ये...’

‘वसंतनाना यांना बळीचं बकरा बनवलंय’

बळीचा बकरा कोणाला तरी करायचा म्हणून वसंतराव देशमुख यांना उभं केलं आहे. कारण निवडणूक लढवून जिंकायची होती, नाही तर घराच्या बाहेर तिकिट द्यायची सवयच नाही. जिंकायची असती तर घरातच उमेदवारी दिली असती आणि लढाईही केली असती. पण काय होणार आहे, हे त्यांना माहिती आहे, असा टोलाही पालकमंत्री गोरे यांनी मोहिते पाटलांना लगावला.

त्या गोरेच्या ताब्यात जिल्हा देता का?

ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील प्रस्थापित आता सगळ्यांना फोन करत आहेत. राजेंद्र राऊतांनी जिल्हा सहकारी बॅंकेत असं केलं. अनेक ठिकाणी फोन करून आपलं जुनं नातं आहे, असे सांगतात. मध्येच म्हणतात ‘त्या गोरेच्या ताब्यात जिल्हा देता का? समाधानदादा तुमची आमदारकी मला तुम्ही देणार आहात का? मी इकडं पद घ्यायला आलो नाही. माझा काही संबंधच नाही.

मी तुमचा पोस्टमन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर जिल्ह्यातल्या नेते आणि जनतेच्या मधला मी पोस्टमन आहे. तुमचं मत भावना पोस्टात टाकता तुम्ही आणि ते मी देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचवतो. याच्यापलीकडे माझा काहीही रोल नाही. फक्त तो रोल मी इमानदाराने करतो, असेही गोरे यांनी नमूद केले.

Jaykumar Gore-Dhairyasheel Mohite Patil
Balasaheb Thorat : ठाकरेंची शरणागती की पवारांची गेम? मविआ नेत्यांमध्ये एकमत होईना; थोरातांच्या 'त्या' विधानाने खळबळ!

सूचनेप्रमाणे 'कार्यक्रम'ही लावतो

तिथून (वरिष्ठांकडून) आलेल्या सूचनांचा मी तंतोतंत पालन करतो. मग कुणाचा कार्यक्रम करण्याच्या सूचना असतील किंवा कुणाला कार्यक्रमाला लावायच्या सूचना असतील. त्या सूचनाचं तंतोतंत पालन करतो. असे म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी आपण माध्यम असल्याचं सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com