Sanjay Raut  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Shivsena News : खासदार संजय राऊतांच्या गाडीवर सोलापुरात चप्पल फेकली...

Vijaykumar Dudhale

Saolpur News : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली आहे. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील बाळे येथे रविवारी (ता. 10 डिसेंबर) सायंकाळी घडली. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत ही घटना घडल्यामुळे सोलापुरातील शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. (Slippers thrown at MP Sanjay Raut's car in Solapur...)

दरम्यान, चप्पलांनी भरलेली पिशवी संजय राऊत यांच्या गाडीवर फिरकावून संबंधितांनी घटनास्थळावरून पलायन केले आहे. मात्र, त्यांनी नारायण राणे झिंदाबाद अशा घोषणा दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगण्याची चिन्हे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार संजय राऊत हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. दिवसभर शहरातील पक्षाचे कार्यक्रम आटोपून खासदार राऊत हे सोलापूरचे उपनगर असलेल्या बाळे येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक तात्या भवर यांच्या हॉटेलचे उद्‌घाटन करण्यासाठी गेले होते. कार्यक्रमाला शिवसैनिकांनी गर्दी केली होती.

बाळे येथील हॉटेलचे उद्‌घाटन आणि भाषण करून खासदार राऊत हे सोलापूरच्या दिशेने येत होते. त्यावेळी उड्डाणपुलावरून अज्ञातांनी राऊत यांच्या गाडीवर चप्पलेने भरलेली पिशवी फेकली, त्यामुळे एकच खळबळ उडाली. राऊत यांची गाडी पुढे सोलापूकडे निघून गेली. शिवसैनिकांनी ती चप्पलेने भरलेली पिशवी तातडीने बाजूला केली.

राऊतांच्या गाडीवर चप्पला भरलेली पिशवी फेकल्यानंतर अज्ञातांनी घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, जाताना त्यांनी नारायण राणे झिंदाबाद अशा घोषणा दिल्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, चप्पल फेकणाऱ्यांची ओळख पटू शकली नाही. कार्यक्रमाच्या आयोजकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले, त्यामुळे कार्यक्रम शांततेत पार पडला.

शिवसेना सोडल्यापासून नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यातील नाते सर्वश्रूत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर अगदी खालच्या पातळीवर टीका करत आहे. राणे यांच्याकडून तर राऊतांचा एकेरी उल्लेख करत समाचार घेतला जातो. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये कायम आरोप-प्रत्यारोप रंगलेले असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT