Dada Bhuse On Sanjay Raut : ‘संजय राऊत हा दलाल माणूस, त्याला वाटते मी मुख्यमंत्री होईल’

Maharasahtra Politics on Minister Dada Bhuse & Sanjay Raut accucation-मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना नेते राऊत यांना अतिशय तिखट भाषेत उत्तर देत, त्यांना मालेगावची माफी मागावी लागेल असा दावा केला.
Sanjay Raut & Dada Bhuse
Sanjay Raut & Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : संजय राऊत यांनी जे आरोप केले, त्याला मी सभागृहात व सभागृहाबाहेर उत्तर दिलेले आहे. राऊत हे जामीन घेण्यासाठी न्यायालयात आले होते, हे त्यांनी विसरू नये. या प्रकरणात एक दिवस नक्कीच त्यांना मालेगावची माफी मागावी लागेल, असा दावा बंदरे विकासमंत्री दादा भुसे यांनी केला. (Dada Bhuse said, Shivsena Leader Sanjay Raut is a political broaker)

शिवसेना (Shivsena) नेते राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे मंत्री भुसे (Dada Bhuse) भ्रष्ट असल्याचा आरोप केला होता. त्याला भुसे यांनी प्रत्युत्तर देत राऊत यांच्यावर विविध राजकीय आरोप केले.

Sanjay Raut & Dada Bhuse
Sanjay Raut News : भाजपचे षडयंत्र, शिवसेना आणि राष्ट्रावादीला नेस्तनाभूत करायचं

शिवसेनेचे राऊत यांनी भुसे यांच्यावर केलेल्या आरोपांना भुसे यांनीदेखील तेवढेच सडेतोड उत्तर दिले आहे. एरव्ही बोलताना संयम पाळणारे भुसे यांनी राऊत यांची चांगलीच खरडपट्टी काढली. ते म्हणाले, राऊत हे मालेगावच्या न्यायालयात मी केलेल्या खटल्यात जामीन घेण्यासाठी आले होते. ते काही स्वातंत्र्यसैनिक नाहीत. माझ्यावर जे आरोप केलेत, त्याला यापूर्वीच उत्तर दिलेले आहे.

राऊत यांनी राज्यातील सरकार बदलल्यावर आज ज्या तुरुंगात शिवसेना उपनेते अद्वय हिरे आहेत, त्याच तुरुंगात दादा भुसे असतील, या राऊत यांच्या टीकेला भुसे यांनी, मुंगेरीलाल के हसीन सपने असा टोमणा मारून दुर्लक्ष केले. भुसे यांनी चुकीचे काम करील वा अन्य कोणीही असोत, त्याला त्याचे उत्तर द्यावे लागेल.

भुसे यांनी राऊत चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, राऊत हा एक दलाल माणूस आहे. ते स्वतःला शिवसेनाप्रमुख समजू लागले आहेत. त्यांच्या मनामध्ये वेगळी स्वप्न आहेत. त्यांना असं वाटतं की, मी शिवसेना पक्षप्रमुख होईल. मी दलाली करून मीठ शिवसेनेचं खायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दलाली करायची. कधी तरी माझी मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागून जाईन. मात्र, जो दुसऱ्यांसाठी खड्डे खोदतो, त्यात तो स्वतःच पडतो, हा जुना अनुभव आहे.

Sanjay Raut & Dada Bhuse
Sanjay Raut On Ajit Pawar : ‘भाजपमध्ये जायला सांगितले होते, तर अजित पवार परत का आले’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com