Radhakrishana Vikhe Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Radhakrishana Vikhe Patil On Gokul : ''...तर 'गोकुळ'वर कारवाई केली जाईल!''; मंत्री विखेंचा सूचक इशारा

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur : 'गोकुळ' जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील काही प्रकरणामध्ये गैरकारभार झाल्याची तक्रार करण्या आली होती. त्यानूसार गोकुळमध्ये विशेष लेखापरीक्षण झाले आहे. त्याचा अहवाल सरकारकडे आलेला नाही. याचदरम्यान, राज्याचे महसूल आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सूचक इशारा दिला आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांनी कोल्हापूर येथे शुक्रवारी (दि.३०) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी खासदार धनंजय महाडिक, सत्यजित कदम उपस्थित होते. पाटील म्हणाले, गोकुळमधील गैरकारभाराचे मुद्दे असलेला प्राथमिक अहवाल आला आहे. प्राथमिक स्वरुपात ज्या ठिकाणी अनियमितता दिसून येत आहे. त्याचे संघाकडून खुलासे मागवले आहेत. दरम्यान, खुलासे देवूनही ही अनियमितता दिसून येत असेल तर 'गोकुळ'(Gokul)वर कारवाई केली जाईल असं सूचक विधान केलं आहे.

काय आहे प्रकरण...?

गोकुळमध्ये काही प्रकरणामध्ये गैरकारभार झाल्याची तक्रार संचालिक शौमिका महाडिक यांनी तक्रार केली होती.यावर आता विखे पाटील म्हणाले, गोकुळमध्ये विशेष लेखापरिक्षण झाले आहे. त्याचा अहवाल अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांने ही माहिती दिली आहे. हा अहवाल तात्काळ शासनाकडे पाठवायला सांगितला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोणत्याही दूध संघ किंवा संस्थेला दूधाची विक्री किंवा खरेदी थांबवता येणार नाही. अमूलही सहकारी संस्थेचे फेडरेशन आहे. ही खासगी संस्था नाही. अमूलकडून प्रतिलिटर ४० रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. तर महाराष्ट्रातील दूस संघ ३२ रुपये दर देतात. अमूल आणि इतर दूध संघांमध्ये स्पर्धा असल्याशिवाय शेतकऱ्यांच्या दूधाला चांगला दर मिळणार नाही. महाराष्ट्रात दूधाची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत आहे. त्यामुळे अमूल किंवा इतर संघांना महाराष्ट्रात बंदी घालता येणार नाही.

' हे ' तुणतुणं वाजवणं बंद करा...

संघांनी आणि संस्थांनी कच्च्या मालाचे दर वाढले म्हणून जनावरांच्या खाद्याचे दर वाढवल्याचे तुणतूणे वाजवणे बंद करावे. दूधाचे दर वाढवता आणि त्यानंतर लगेच खाद्याचे दरवाढ करता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही शिल्लक रहात नाही. ज्यावेळी दूधाचे विक्री दर वाढतात त्यावेळी मात्र खाद्याचे दर कमी करण्याऐवजी आहे तेवढेच ठेवले जातात. हे आता बंद झाले पाहिजे असेही विखे पाटील यांनी सांगितले.

दूधाला किमान ३५ रुपये दर हवा...

महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर किमान ३५ रुपये दर मिळावा अशी आमची भूमिका आहे. एखादा संघ प्रतिलिटर ४० रुपये दर दिला तरीही चांगले आहे. राज्यात भौगोलिक परिस्थितीनूसार दर दिला जाईल. पण हा दर किती असावा यासाठी ज्या-त्या जिल्ह्यातील प्रमुख संघ, संस्था किंवा संस्था प्रतिनिधींनी ठरवावा. यासाठी राज्य पातळीवरील समिती नियुक्त केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT