Kolhapur, 05 July : गोकुळ दूध संघाच्या चुकीच्या कारभाराविरोधात नेहमी आवाज उठवला आहे. पण, सत्ताधाऱ्यांकडून व्यक्तिगत टीका केली जाते. सत्ताधाऱ्यांकडून खुलासा मागितल्यावर त्यांच्याकडून राजकीय आणि व्यक्तिगत आरोप होतात. गोकुळच्या कारभाराविषयी न्यायालयापर्यंत धाव घेतली आहे. पण, सध्या ही कारवाई थांबवली आहे.
सत्ताधाऱ्यांकडून (Rulers) आमच्यावर सुडाच्या राजकारणापायी कारवाई सुरू असल्याची टीका सुरू आहे. न्यायालयाने गोकुळच्या सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. गोकुळ (Gokul Dudh Sangh) बदनाम नको म्हणून कारवाई थांबवली आहे; अन्यथा गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त होऊ शकते. अजूनही वेळ गेलेली नाही, कारभार सुधारला पाहिजे, अशा शब्दांत गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.
निनावी पत्राच्या विषयावरून त्या आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होत्या. संचालकांना आणि गोकुळला मिळालेले हे निनावी पत्र खोडसाळपणाने लिहिलेलं नाही. संबंधित व्यक्तीला सर्व घटनांची माहिती आहे. निनावी पत्र आहे म्हणून दुर्लक्ष करू नका, त्या संदर्भात चौकशी करणं हे सत्ताधाऱ्यांचे काम आहे. केवळ खुलासा देऊन हात झटकण्याचं काम करू नये, असे आवाहनही संचालिका महाडिक यांनी केले.
महाडिक म्हणाल्या, गोकुळच्या प्रत्येक प्रश्नावर मी आवाज उठवला आहे. पण, सत्ताधाऱ्यांकडून उत्तर मिळाली नाहीत. गोकुळच्या कारभाराविषयी मी सध्या शांत बसले. कारण, दूध उत्पादक शेतकऱ्यांनीच आता भूमिका मांडावी. दूध चोरी करणाऱ्या आणि 35 लाखांचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करणे गरजेचे होते.
या प्रकरणात केवळ चार लोक बडतर्फ करून चालणार नाही, इतर व्यक्तींचाही शोध घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये हस्तक्षेप असणाऱ्या सर्व संस्थावर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी शौमिका महाडिक यांनी केली.
निनावी पत्रावरून बोलताना, गुरुवारी आम्हा सर्व संचालकांना पशुसंवर्धन विभागातील घोटाळ्याबाबत सविस्तर कथित घोटाळ्याचे पत्र मिळाले आहे. हे पत्र निनावी असले तरी संबंधित व्यक्तीला याबाबत सविस्तर माहिती आहे. त्या व्यक्तीला समोर यायचे नाही. पण, हा कारभार त्या व्यक्तीला पटला नसावा. म्हणूनच या पत्राला दुर्लक्ष करून चालणार नाही. गोकुळमधील सत्ताधाऱ्यांनी त्या पत्राची दखल घेऊन त्याची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी संचालिका शौमिका महाडिक यांनी केली.
Edited By : Vijay dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.