Shoumika Mahadik : ...तर शौमिका महाडिक गप्प बसणार नाहीत, दिला इशारा

Shoumika Mahadik loksabha Election Agenda : छत्रपतींचा अपमान, कोल्हापूरच्या अस्मितेचा अपमान आणि कोल्हापूरकरांचा अपमान या गोष्टी मला पटत नाहीत. अशा शब्दात गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Shoumika Mahadik
Shoumika MahadikSarkarnama
Published on
Updated on

loksabha Election : जेव्हा निवडणूक होत असतात, त्यावेळी आपण गृहीत धरलं पाहिजे. आपण ज्या चिखलात उतरणार आहोत त्याचे शिंतोडे आपल्यावरही उडणार आहेत. राजकारण हे वाईट नाही. पण राजकारणात असणारे खेळाडू वाईट पद्धतीने खेळतात. म्हणून राजकारण वाईट झाले आहे. विरोधकांनी सांगितला आहे, की प्रचाराची पातळी खाली नेऊ नका. मात्र सुरुवात त्यांनीच केली आहे. छत्रपतींच्या विरोधात एक सामान्य माणूस उभा राहतोय, हीदेखील पहिली वेळ नाही. त्यामुळे छत्रपतींचा अपमान, कोल्हापूरच्या Lok Sabha Election अस्मितेचा अपमान आणि कोल्हापूरकरांचा Kolhapur अपमान या गोष्टी मला पटत नाहीत, अशा शब्दांत गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक Shoumika Mahadik यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Latest Update on Kolhapur Lok Sabha election news

हा खेळ आहे, राजकारण आहे. तुम्ही उमेदवार आहात आम्हीही उमेदवार आहोत. तुमच्याकडे चेहरा नाही म्हणून महाराजांना तुम्ही गळ घातली. महाराज मला आदरणीय आहेत. मी त्यांच्या घरची आहे. पण त्यांचा वापर करणाऱ्यांच्यावर विश्वास नाही. त्यांची ढाल करून लढणाऱ्यांवर त्यावर माझा आक्षेप असणार आहे. केवळ आणि केवळ छत्रपतींचा वापर त्यांच्याकडून सुरू आहे, अशा शब्दांत गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक Shoumika Mahadik यांनी काँग्रेसच्या Congress नेत्यांवर निशाणा साधला आहे.

या निवडणुकीत मी वैयक्तिक पातळीवर टीका करणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, की कुणीही वैयक्तिक पातळीवर टीका करू नये. विरोधकांना एक सल्ला आहे. जर ही निवडणूक महाडिक विरुद्ध पाटील करत असतील, तर मी गप्प बसणार नाही. माझे कार्यकर्तेही गप्प बसणार नाहीत. त्या शब्दांत शौमिका महाडिक यांनी इशारा दिला आहे.

Shoumika Mahadik
Kolhapur Lok Sabha 2024: अजूनही वेळ गेलेली नाही, शाहू महाराजांनी फेरविचार करावा, मुश्रीफांनी पुन्हा डिवचले

महायुती म्हणून खासदार संजय मंडलिक Sanjay Mandlik यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे. काही कार्यकर्त्यांनी त्यामागे कसूर ठेवायची नाही. आयपीएलचे सामने सुरू झाले आहेत. तसेच आपलीही मॅच इथे सुरू झालेली आहे. त्यामुळे कोणीही विलंब करू नका. आपली टीम चांगली आहे. विरोधकांकडे कॅप्टनचा चेहरा लावण्यासाठी जागा नाही. आमचा कॅप्टन एकच पंतप्रधान नरेंद्र मोदी. राहुल गांधींचा Rahul Gandhi फोटो लावून ते प्रचार करत नाहीत, असा टोला शौमिका महाडिक यांनी लगावला.

दर पाच पाच वर्षांनी निवडणुका होत असतात, प्रत्येक निवडणुकीला समीकरण बदलत असते. जर कोण विधानसभेचा संदर्भ घेऊन म्हणत असेल की आम्ही लोकसभेला एक लाखाचे लीड देऊ तर ते अत्यंत चुकीचे आहे. कारण आपलं काम कुठपर्यंत गेले हे जनतेला माहीत आहे, असा टोला त्यांनी दक्षिणच्या काँग्रेस Congress नेत्यांना लगावला आहे.

दक्षिणचा भावी आमदार असा उल्लेख

महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न होत असताना गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक भाषणाला उभा राहिल्यानंतर व्यासपीठावरील प्रमुख नेत्यांचे आभार मानले. शिवाय अमल महाडिक Amal Mahadik यांचे नाव घेताना त्यांनी भावी आमदार असा उल्लेख केला.

R

Shoumika Mahadik
Sanjay Mandlik News : "थेट वंशज असल्याचं सिद्ध करा, तरच...", मंडलिकांनी विरोधकांना ठणकावलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com