Assembly Session : विधानसभेतील किती आमदार पुढच्या काळात फ्लेमिंगो होतील?; शेलारांच्या प्रश्नावर सुधीरभाऊंचे हजरजबाबी उत्तर...

Sudhir Mungantiwar Vs Ashish Shelar : पैशापेक्षा जीव जंतू, पर्यावरण वाचवणे महत्वाचे आहे. नाही तर एक दिवस असा येईल की मृत्यूचे तांडव येईल आणि माणूस पश्चाताप करत बसेल.
Ashish Shelar-Sudhir Mungantiwar
Ashish Shelar-Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 05 July : फ्लेमिंगो मृत्यू प्रकरणावरील प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. विधानसभेतील किती सदस्य पुढच्या काळात फ्लेमिंगो होणार आहेत, असा खोचक सवाल शेलार यांनी केला, त्यावर मुनगंटीवार यांनीही ‘त्यासाठी चित्रगुप्ताचं संगणक बघावं लागेल. मगच त्याबाबत सांगता येईल,’ असे हजरजबाबी उत्तर दिले.

आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांनी फ्लेमिंगोच्या मृत्यू प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, फ्लेमिंगो (Flamingo) मृत्यू प्रकरणासारख्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. कारण, प्रत्येकाला कधी ना कधी 84 लक्ष योनीतून कधी ना कधी जायचं आहे. फ्लेमिंगो म्हणून आशिष शेलारही (Ashish Shelar) जाऊ शकतात किंवा मीही जाऊ शकतो. अशा मृत्यूची वेळ कोणावरही येऊ नये, यासाठी हा जो प्रवास आहे, त्याला आता सुरक्षित केलं पाहिजे. म्हणून मी उच्चस्तरीय समितीही गठीत केली आहे.

मला विश्वास आहे की, ही उच्चस्तरीय समिती आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अध्यक्षांना आपण यासंदर्भात घेतलं आहे की, ही सोसायटी आशिया खंडातील सर्वांत उत्तम आहे. पैशापेक्षा जीव जंतू, पर्यावरण वाचवणे महत्वाचे आहे. नाही तर एक दिवस असा येईल की मृत्यूचे तांडव येईल आणि माणूस पश्चाताप करत बसेल. तशी वेळ येऊ नये, यासाठी या समितीला अभ्यास करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिला आहे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

त्या समितीला दोन महिन्यांत संपूर्ण अहवाल देण्यास सांगितले आहे. सदस्यांनी प्रश्न विचारला नसला तरी हा अहवाल पटलावर ठेवला जाईल आणि जे आमदार पुढच्या जन्माची चिंता करतात. ते हा अहवाल वाचून त्यावर उपाय सुचवतील, असे उत्तर दिले.

सुधीरभाऊंनी दिलेल्या उत्तरात शेलारांचे नाव घेतल्यामुळे त्यांनी खोचक सवाल विचारत मुनगंटीवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, मंत्री महोदयांनी आपल्या वैज्ञानिक ज्ञानाबरोबरच अध्यात्मिक ज्ञानही दिलं. तसेच त्यांचा ओढा वैज्ञानिक ज्ञानाबरोबरच अध्यात्मिक ज्ञानाकडे असल्यामुळे ते असं म्हणाले की, 84 लक्ष योनीतून सर्वांना जावे लागणार आहे. सुधीरभाऊ तुम्ही आणि माझंही नावं घेतलं त्यामुळे मीही जाणार आहे. त्यामुळे या सभागृहातील किती सदस्य 84 लक्ष योनीतून फ्लेमिंगो म्हणून पुढच्या काळात जाणार आहेत, याची स्पष्टता देऊ शकतील का?

Ashish Shelar-Sudhir Mungantiwar
Gokul Dudh Sangh : गोकुळ दूध संघात 35 लाखांचा घोटाळा करणाऱ्याला अभय कोणाचे?

शेलारांच्या खोचक सवालावर सुधीरभाऊंनी तेवढ्याच हजरजबाबीपणाने उत्तर दिले. अध्यक्षमहाराज आशिष शेलार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल तर चित्रगुप्तांचं संगणक बघावं लागेल. मगच त्याबाबत सांगता येईल. ते अतिशय गोपनीय आहे. ही गुप्त माहिती असल्यामुळे सभागृहाच्या पटलावर कोणत्याही परिस्थितीत ठेवता येणार नाही, असे मुनंगटीवार यांनी सांगितले.

सुधीरभाऊंच्या उत्तरावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही कोटी करत ही माहिती पटलावर ठेवता येत नसेल, तर त्यावर आता चर्चा करायला नको, असे सांगून कामकाज पुढे नेण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला.

Ashish Shelar-Sudhir Mungantiwar
Dindori Lok Sabha Constituency : अहो आश्चर्यम...! एक लाख मते घेणाऱ्या उमेदवाराचा खर्च अवघा वीस हजार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com