Prithviraj Chavan, Eknath Shinde, Devendra Fadnavis  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan News : '' ...म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा!''; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची मोठी मागणी

Jalna Maratha Protest News : '' आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून...''

Deepak Kulkarni

Karad : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करत गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण( Prithviraj Chavan) यांनी कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी जालना घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे. मराठा आरक्षण देण्याबाबत भाजपने कायमच पोकळ घोषणा आतापर्यंत केल्या आहेत.

केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजपा सरकार(BJP Government) आरक्षण का देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट करावे. इतकी वर्षे प्रलंबित असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांच्याकडून आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु असताना अशावेळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलनच दडपण्याचा क्रूर प्रकार सरकारकडून केला जात आहे. मराठा बांधवांवर झालेला लाठीचार्जची घटना निंदनीय असून या घटनेची गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायला हवा.

''...म्हणून ते चालढकल करत आहेत!

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जालन्यातील घटनेवरुन राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, मराठा समाजाला जर शिंदे, फडणवीस, पवार यांचे तिघाडी सरकार आरक्षण देऊ शकत नसेल, तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात, आम्ही आरक्षण देऊ असे पटोले म्हणाले.

काँग्रेस आघाडी सरकारने दिलेले मराठा आरक्षण फडणवीस सरकारला कोर्टात टिकवता आले नाही. पुन्हा फडणवीस सरकारने मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा प्रयत्न केला,पण तेही कोर्टात टिकले नाही. मुळात भाजपाला आरक्षण द्यायचेच नाही म्हणून ते चालढकल करत आहेत असा आऱोपही त्यांनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT