Nana Patole News : '' मराठा समाजाला मीच आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनी आरक्षण तर दिलेच नाही, पण पोलिसांच्या...''; पटोलेंचा घणाघात

Congress Political News : मराठा समाजाच्या आरक्षणाचा गुंता वाढवण्यास फडणवीस व मोदी सरकारच जबाबदार आहे.
nana patole, devendra fadnavis
nana patole, devendra fadnavis sarkarnama

Pimpri Chinchwad : मराठा समाजाला मीच आरक्षण देतो म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण,तर दिले नाहीच. उलट आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांच्या लाठ्यांनी मारले असा हल्लाबोल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

केंद्र सरकारने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्याची मागणीही त्यांनी केली. पोलिसी बळाचा वापर करुन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न येड्याचे सरकार करत आहे,असे ते म्हणाले. फडणवीस व मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे,असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले(Nana Patole) यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या आंदोलनावर शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध व्यक्त केला .तसेच मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर खुर्ची खाली करा असा इशाराही त्यांनी दिला.

nana patole, devendra fadnavis
Mungantiwar On Congress : गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींची नऊ-नऊ तास चौकशी केली, तो सदुपयोग होता का?

मराठा समाजाला जर शिंदे, फडणवीस, पवार यांचे तिघाडी सरकार आरक्षण देऊ शकत नसेल, तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात, आम्ही आरक्षण देऊ असे पटोले म्हणाले. काँग्रेस आघाडी सरकारने दिलेले मराठा आरक्षण (Maratha Reservation) फडणवीस सरकार(ला कोर्टात टिकवता आले नाही. पुन्हा फडणवीस सरकारने मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला,पण तेही कोर्टात टिकले नाही. मुळात भाजपाला आरक्षण द्यायचेच नाही म्हणून ते चालढकल करत आहेत,असा आऱोप त्यांनी केला.

मविआचे सरकार असताना हेच फडणवीस मराठा समाजाला फक्त मीच आरक्षण देऊ शकतो अशी राणा भिमदेवी थाटात घोषणा करत होते पण दीड वर्ष झाले सत्तेत येऊन होऊनही ते आरक्षणावर चकार शब्द काढत नाहीत. काऱण ते व भाजप दोघेही खोटारडे आहेत, त्यांनी मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे,असे पटोले म्हणाले.

nana patole, devendra fadnavis
Ahmednagar News : नगर जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या सदस्या भाग्यश्री मोकाटेंना 'सीआयडी'कडून साडेसहा वर्षानंतर अटक, 'हे' आहे प्रकरण

मराठा समाजाच्या आरक्षणाचा गुंता वाढवण्यास फडणवीस व मोदी सरकारच जबाबदार आहे,असे पटोले म्हणाले.मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल, तर ५० टक्क्यांची मर्यादा काढण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागेल.पण केंद्रातील भाजपचे सरकार त्यासाठी काहीच हालचाल करत नाही.

राज्यात सत्तेवर असलेल्या तिन्ही पक्षातील कोणाचीही मोदींसमोर त्यासाठी बोलण्याची हिम्मत नाही. त्यामुळे केवळ समिती, बैठका व चर्चेचे गाजर दाखवून चालढकल केली जात आहे,असे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काँग्रेस (Congress) कटिबद्ध आहे असेही पटोलेंनी स्पष्ट केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com