Udayanraje Bhosale News : छत्रपती शिवाजी महाराजांना संपविण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे जर कोणी उदात्तीकरण करत असेल तर ते योग्य नाही. त्याच्याच कबरीपुढे जाऊन काही लोक फुलं वाहतात, पाया पडत असतील तर ते निषेधार्य आहे. हा प्रकार असाच होत राहिला तर वर्षाच्या आत देशातील राजकिय समीकरणे बदतील. राजकिय पक्षांचे तुकडे होऊन प्रत्येक राज्य हा एक देश होईल, अशी भिती खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे व्यक्त केली.
खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी आज त्यांच्या जलमंदीर निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अनौपचारिक गप्पा मारताना औरंगजेबाचा डिपी ठेवण्याचा प्रकार जो कोल्हापूरमध्ये Kolhapur झाला त्यावर त्यांनी भाष्य केले. उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना संपविण्यासाठी जी व्यक्ती आली होती. त्याचे उदात्तीकरण होत असेल तर योग्य नाही. तो काय महान नव्हता. या प्रकाराचा मी निषेध करतो.
एकीकडे आपण शिवतीर्थ, शिवाजी महाराजांचा विषय आपण घेतोय. त्यावेळी अशा घटना घडत असतील तर ते निषेधार्य आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज महान होते, असे आपण बोलतो तर दुसरीकडे त्यांच्या शत्रुचे उदात्तीकरण करण्याचा प्रकार होत असेल तर ते घातक आहे. त्याच्याच कबरीपुढे जाऊन काही लोक फुलं वाहतात, पाया पडत असतील तर ते निषेधार्य आहे.
आज ना उद्या देशातील समीकरणे बदलतील. त्यावेळी काय अवस्था होईल याचा विचार करा. ही परिस्थिती अशीच राहिली तर आगामी वर्षाच्या आत देशातील समीकरणे बदलतील. राजकिय पक्षांचे तुकडे होतील. प्रत्येक राज्य एक देश होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली. तर या परिस्थितीवर मात करुन देश एकसंध राहावा, अशी मी प्रार्थना करतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.