Satara News : शिवतीर्थाचे पावित्र्य जपणार; देसाईंसोबत जुंपून देण्याचे विकृत प्रवृत्तीकडून प्रयत्न : उदयनराजे

Udayanraje Bhosale शिवतीर्थावरुन सध्या सातारकर व पालकमंत्री देसाई असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Udayanraje Bhosale News : लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे राज्याच्या जडणघडणीत मोठे योगदान असून त्यांच्या स्मारकास आमचा बिलकुल विरोध नाही. पण, शिवतीर्थावरील स्मारकावरुन कोणताही वाद नसताना पालकमंत्री शंभूराज देसाई व माझ्यात जुंपून देण्याचे काम काही विकृत प्रवृत्ती करत आहे. पोवई नाक्यावरील शिवतीर्थाचे पावित्र जपले जाईल, त्यासाठी जे जे करावे लागेल ते केले जाईल, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

शिवतीर्थावरुन सध्या सातारकर व पालकमंत्री देसाई Shambhuraj Desai असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर ही निशाणा साधला. उदयनराजे म्हणाले, शिवतीर्थाबाबत कोणताही वाद नसताना माझ्यात व पालकमंत्री देसाई यांच्यात जंपून देण्याचे काम काहीजण करत आहेत.

स्वत:चे उदो उदो करुन घेणारा मी नाही. मुलांनी स्वत:हून माझे पेंटींग काढले. त्याला पालकमंत्र्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री शंभूराज देसाई व आमची फार जुनी व कॉलेजपासूनची मैत्री आहे. उगाच वाद लावून देण्याचे काम सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी व्देषाचे अहंकाराचे राजकारण योग्य नाही. शिवतीर्थ हा एतिहासिक परिसर आहे. त्यावेळी एक समिती होती, त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. त्यावेळी बाळासाहेब देसाई मंत्री होते, त्यांच्या हस्ते शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वेगळ्या व देखण्या पुतळ्याचे अनावरण झाले.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara News : उदयनराजे संतप्त : म्हणाले, कोयता, तलवारी नाचवणाऱ्यांचा बंदोबस्‍त करा...

लोकनेते बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्राचे महान नेते होते. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे त्यांच्या नावाचे स्मारक होण्यासाठी आमचा बिलकुल विरोध नाही. काही जणांकडून तसे भासवले जात आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नाही पण ज्या ठिकाणी स्मारक उभे करण्याचा आग्रह केला जातोय. त्याच्या खाली ग्रेड सेपरेटर आहे. त्याची तांत्रिक माहिती घ्यावी लागेल. त्यांच्या स्मारकास आमचा हातभार असेल.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara News : शिवेंद्रराजेंचा उदयनराजे, देसाईंना चिमटा : म्हणाले, नेत्यांच्या 'इगो'चा सातारकरांना फटका

त्यावेळी जमिन भरीव होती, आता ग्रेडेपरेटर झाल्यामुळे तेथे तांत्रिक तपासणी करुनच निर्णय घेणे गरजेचे आहे. सातारकरांची मागणी भावनिक आहे. पण, तांत्रिक दृष्टया विचार करणे गरजेचे आहे. ही जागा पालिकेकडे असली तरी मालकी जिल्हा परिषदेची आहे. पण जिल्हा परिषद एक रुपयाही खर्च करत नाही. म्हणूनच ही जागा आम्ही पालिकेकडे द्या असे सांगत आहोत.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Pune Crime News : धक्कादायक! एमपीएसीत सहावी आलेल्या युवतीचा संशयास्पद मृत्यू; राजगडाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह

शिवतीर्थावरील या पवित्र कामासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. एवढे वर्षे कोणीही लक्ष दिले नाही, आम्ही पुढाकार घेतला असून १६ कोटी रुपये या शिवतीर्थ स्मारकासाठी मंजूर करुन आणले आहेत. त्यामुळे याची चेष्ठा करुन अहंकाराची भाषेत बोलण्यापेक्षा त्यांनी विचार करावा. माझ्यात आणि शंभूराज देसाईंमध्ये जूंपून देण्याचे काम ही विकृत प्रवृत्ती करत आहेत.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Uddhav Thackeray on Modi : उध्दव ठाकरेंकडून मोदी- शाह यांची हिटलरशी तुलना ; म्हणाले, '' हिटलरसुद्धा असाच...''

माझे कोणाशीही वैरत्व नाही. सगळ्यांशी मैत्रत्वाचे संबंध आहेत. अहंकारातून व्यक्ती व्देष निर्माण करण्याचे काम ते करत आहेत, असा टोला त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंचा नामोल्लेख टाळून लगावला. शिवतीर्थ परिसर ऐतिहासिक असून तो तसाच राहावा, अशी सर्व शिवप्रेमींसह माझी व शंभूराज देसाईंची भावना आहे. हा परिसर अधिक सुशोभित कसा करता येईल, थ्रीडी स्ट्रक्चरमध्ये स्मारक उभारण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
BJP on Congress: युवक काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा : काँग्रेसने आपली संस्कृती दाखवलीच; भाजपची टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com