Mumbai Hostel Case: मुंबईतील शासकीय वसतिगृह अधीक्षिकेचे निलंबन; चंद्रकांत पाटील यांची माहिती

Chandrakant Patil : मुंबईतील शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थिनीच्या खून प्रकरणी राज्य सरकारची मोठी कारवाई
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

Mumbai News: मुंबई येथील सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातील अधीक्षिकेचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेचा तपास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांची दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याबरोबरच न्याय देण्याचे आश्वासनही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले.

Chandrakant Patil
Police Inspector Transfer: राज्यातील 449 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; राज्य सरकारचा मोठा निर्णय

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, "घडलेल्या या घटनेची सरकारने गांभीर्याने दखल घेतली. या घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार, वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात आले आहे. याबरोबरच मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली", असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, "याबरोबरच कुटुंबीयांतील त्यांच्या मुलाला कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. या घटनेनंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अर्गत येणाऱ्या सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेण्यात येणार असून महिला सुरक्षा रक्षकही देण्यात येईल", असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

Chandrakant Patil
Ayodhya Paul Ink Attack : मोठी बातमी! ठाकरे गटाच्या 'फायरब्रँड' नेत्या अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक

मुंबई येथील मरीन ड्राईव्ह परिसरातील एका शासकीय वसतिगृतील विद्यार्थीनीवर वसितीगृहाच्या सुरक्षा रक्षकाने अत्याचार करत हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्याने स्वत:देखील रेल्वेखाली आपला जीव दिला होता. या प्रकरणी आता शासकीय वसतिगृहातील अधीक्षिकेचे निलंबन करण्यात आले आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com