Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

तर, त्यांना फलटणच्या पुढे येऊ देणार नाही... रामराजेंनी दिले गोरेंना आव्हान

सरकारनामा ब्युरो

पिंपोडे बुद्रुक : आमच्याकडे पण, राजकिय ताकत आहे, लोकं आहेत. मला वाटेल ते मी बोलायला मी मोकळा नाही. ज्यांना स्वतःच्या भागात काही करता आले नाही. त्यांचे इथे स्वागत होणार असेल तर मी त्यांना फलटणच्या पुढे येऊ देणार नाही, असे आव्हान विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार गोरेंना दिले.

नांदवळ (ता.कोरेगाव) येथे एनआयसीडीसी समर्थनार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. आमदार दीपक चव्हाण, लालासाहेब शिंदे, अशोकराव लेंभे, सतीश धुमाळ, नागेश जाधव, संजय साळुंखे, ललित मुळीक, संग्राम सोळसकर, दयाराम सोळसकर, मनोज अनपट, दीपक पिसाळ उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, माणमध्ये पवनचक्क्या आल्या तेव्हा आमदारांनी काय व्यवहार केलेत. जे माझी जमीन इथे आहे, असे म्हणतात. त्यांचीच जमीन म्हसवडला आहे. आमच्याकडे पण, राजकीय ताकद आहे, लोकं आहेत. मला वाट्टेल ते बोलायला मी मोकळा नाही. ज्यांना स्वतःच्या भागात काही करता आले नाही. त्याचं इथे स्वागत होणार असेल तर मी त्यांना फलटणच्या पुढे येऊ देणार नाही.

लोकांनी धरणातील पाण्याच्या प्रदूषणाबाबत विचारले असता रामराजे म्हणाले, जर पाणी प्रदूषित झाले तर मीच हा प्रकल्प होऊ देणार नाही. प्रदूषण आणि पुनर्वसनाचा प्रश्न उद्भवणार नाही. आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की, औद्योगिक कॉरिडॉरला कोरेगावची जागा देऊ. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्हाला म्हसवडला कॉरिडॉर करायचा असेल तर आम्हाला राज्याची अडीच-तीन हजार एकराची एमआयडीसी द्या.

मात्र, कॉरिडॉर झाला तर एक लाख लोक कामाला लागतील. म्हसवडला झाला तर तो यशस्वी होणार नाही. झाला तर कोरेगावलाच होईल. लोकांनी साथ दिली तर सरकारवर अवलंबून न राहता खासगी एमआयडीसी करू. त्यासाठी आपल्याला दबाव गट करावा लागेल.

विरोध नको.. दीपक चव्हाण

जे युवक प्रामाणिक शेती करतात. मात्र त्यांची लग्न जमत नाहीत. एजंटांना लाख-दीड लाख रुपये कमिशन देऊन मागास भागातील मुली लग्न करून इकडे आणाव्या लागत आहेत. हा प्रकल्प झाला तर अनेक पिढ्यांचे कल्याण होणार असल्याने लोकांनी विरोध करू नये, असे मत आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT