Girish Mahajan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Lok Sabha Constituency : सोलापूरच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम; महाजनांनी दाखवले दिल्लीकडे बोट!

Girish Mahajan Solapur Tour : सोलापूर लोकसभेचे तिकीट कोणाला मिळणार, हे मी सांगू शकत नाही. दिल्लीतील पार्लमेन्ट्री बोर्डाचा तो अधिकार आहे. स्थानिक उमेदवार द्या, असा दबाव सगळीकडूनच असतो. आम्ही सर्वच ठिकाणी सर्व्हे केलेले आहेत, त्यानुसार निर्णय होतील

विश्वभूषण लिमये

Solapur News : ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या दौऱ्यानंतरही सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे. महाजन यांनी तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा चेंडू दिल्लीत हायकमांडच्या कोर्टात ढकलला आहे. सोलापूरच्या उमेदवारीचा निर्णय दिल्लीतच होईल, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आज (ता. 15 मार्च) सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सिद्धरामेश्वराचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. पक्षाचा मेळावा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या (Solapur) उमेदवारीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, सोलापूर लोकसभेचे तिकीट कोणाला मिळणार, हे मी सांगू शकत नाही. दिल्लीतील पार्लमेन्ट्री बोर्डाचा तो अधिकार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्थानिक उमेदवार द्या, असा दबाव सगळीकडूनच असतो. आम्ही सर्वच ठिकाणी सर्व्हे केलेले आहेत, त्यानुसार निर्णय होतील, असे सांगून गिरीश महाजन म्हणाले, आमचे सोलापूरचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातप्रमाणपत्राचा विषय न्यायप्रविष्ठ आहे. तो बोगस आहे, असं अद्याप म्हणता येणार नाही.

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये घेण्याचा विषय आता आमच्याकडे कुठेही नाही. त्यांनी त्यांचं काम करावं. पण, अद्याप त्यांचीही काँग्रेसकडून उमेदवारी घोषित झालेली नाही, असा टोला महाजन यांनी शिंदे यांना लगावला.

नाशिकला तीनही खासदार आमचे आहेत. महापालिका आमच्याकडे आहे. मात्र, अगोदर ही जागा शिवसेनेची होती. प्रत्येक कार्यकर्त्यांची मागणी असणे रास्त आहे. पण, शेवटी पार्लमेन्ट्री बोर्ड निर्णय घेईल, असेही महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक दाव्यावर बोलताना सांगितले.

देशातील गरिबांना आम्ही रेशनवर धान्य फुकट देतो आहे. तुमच्या घरी रेशनचे अन्न पाठवू का, असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला. राहुल गांधी पंतप्रधान व्हायला चालले आहेत. मात्र, त्यांच्या सभांना गर्दीही होत नाही.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT