Girish Mahajan Statement : उद्धव ठाकरेंना गद्दारीची किंमत चुकवावी लागत आहे; गिरीश महाजन यांचा दावा

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे भविष्यात हम दो आणि हमारे दो असेच राहणार आहेत. त्यात एक उद्धवजी आणि त्यांचे सुपुत्र आदित्य. तसेच, खासदार संजय राऊत आणि त्यांचे भाऊ असे चारच लोक त्यांच्याकडे शिल्लक राहणार आहेत.
Girish Mahajan-Uddhav  Thackeray
Girish Mahajan-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Solapur News : उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ ७ ते ८ लोक शिल्लक राहिले आहेत. ठाकरे यांनी आपल्याशी (भाजपशी) जी गद्दारी केली आहे, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे, असे धक्कादायक विधान राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांनी सोलापुरात बोलताना केले.

गिरीश महाजन (Girish Mahajan) आज सोलापूर दौऱ्यावर (Solapur Tour) आहेत. सिद्धरामेश्वराचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करत आहेत. त्या मेळाव्यात बोलताना महाजन यांनी हे विधान केले आहे. महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडे भविष्यात हम दो आणि हमारे दो असेच राहणार आहेत. त्यात एक उद्धवजी आणि त्यांचे सुपुत्र आदित्य. तसेच, खासदार संजय राऊत आणि त्यांचे भाऊ असे चारच लोक त्यांच्याकडे शिल्लक राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Girish Mahajan-Uddhav  Thackeray
Pankaja Munde News : पंकजा मुंडेंसाठी नगरमधील ‘मावशी’ बीडच्या मैदानात उतरणार

भारतातील लोकसभेच्या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. देशात काय होणार, याकडे जागाचं लक्ष लागलं आहे. येत्या २ ते ३ दिवसांत निवडणुका जाहीर होतील. आमचे उमेदवार हे नरेंद्र मोदी आहेत. आम्हाला त्यांना पंतप्रधानपदी बसवायचं आहे. मला खोटं बोलता येत नाही. येत्या निवडणुकीत आपण ४५ च्या वर जागा निवडून आणणार आहोत, असा दावाही महाजन यांनी केला.

राहुल गांधी यांच्या सभेला लोक जात नाहीत. नगरसेवकाच्या सभेला गर्दी होते. मात्र, नाशिकमधील राहुल गांधी यांच्या सभेला लोक आले नाहीत, अशी टीकाही गिरीश महाजन यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. दरम्यान, सोलापूर येथील सिद्धारमेश्वर मंदिर यात्री निवासासाठी ५ कोटी रुपये देण्याची घोषणा ग्रामविकासमंत्री महाजन यांनी केली.

Girish Mahajan-Uddhav  Thackeray
Jalgoan Loksabha Constituency : भाजपने ‘टॉप टेन’ खासदाराला बसविले घरी अन्‌ स्मिता वाघांना उमेदवारी देऊन ‘ती’ चूक सुधारली

नियोजनाचा अभाव

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांकडून नियोजनाचा अभाव दिसून आला. मंत्री महाजन व्यासपीठाच्या खाली येऊन थांबलेले असतानाही व्यासपीठावर बॅनर लागले नव्हते. बॅनर लावेपर्यंत गिरीश महाजन यांना खाली थांबून काही वेळ प्रतीक्षा करावी लागली. शेवटी बॅनर लागल्यानंतर गिरीश महाजन यांचे व्यासपीठावर आगमन झाले.

Edited By : Vijay Dudhale

R

Girish Mahajan-Uddhav  Thackeray
Vijay Shivtare Vs Ajit Pawar : अजितदादांना थेट नडणाऱ्या शिवतारेंना मुख्यमंत्री शिदेंनी तब्बल सहा तास ताटकळवलं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com