Lok Sabha Election 2024 : रावेरमध्ये गिरीश महाजन ताकद आजमावणार का? स्पष्टच सांगितलं...

Girish Mahajan News : भाजपकडून काही मंत्र्यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवले जाणार असल्याची चर्चा असून त्यात गिरीश महाजन यांचेही नाव चर्चेत आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे ध्येय महायुतीने ठेवले आहे. हे ध्येय गाठण्यासाठी राज्यातील काही मंत्र्यांना लोकसभेच्या आखाड्यात उतवण्याचे भाजपचे नियोजन असल्याची जोरदार चर्चा आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजनांना तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. त्यावर महाजनांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Lok Sabha Election 2024)

महाजन (Girish Mahajan) यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले की, पक्षाने आपल्याला लोकसभेच्या आठ जागांची जबाबदारी दिली आहे, त्या दृष्टीने आपण काम करीत आहोत. रावेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याबाबत आपला कोणताही संबंध नाही. पक्षाने तसा विचारही केलेला नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

Girish Mahajan
BJP Nasik Politics: भाजप आजमावणार ताकद, ३३ वर्षानंतर देणार नाशिकमध्ये उमेदवार!

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात महाजन रावेर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत थेट गिरिश महाजन यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, माझ्या लोकसभा उमेदवारीबाबत पक्ष नेतृत्वात कधीही चर्चा झालेली नाही, तसा कोणताही विचार पक्षाने केलेला नाही. त्यामुळें रावेर लोकसभा लढण्याबाबत आपला प्रश्नच नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेत पक्षाने आपल्याला आठ जागांची जबाबदारी दिलेली आहे, त्या दृष्टीने आपण काम करीत आहोत. रावेर लोकसभा मतदारसंघात पक्ष नेतृत्व उमेदवारी निश्चित करणार आहे. ज्यांना उमेदवारी पक्ष देईल, त्यांना निवडून आणण्यासाठी आपण पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या साथीने जोमाने प्रयत्न करणार आहोत, असे महाजनांनी सांगितले.

Girish Mahajan
Jalgaon News: राजकारणात छापा-काटा होईल, कुस्ती होईल तेव्हा पाहू...; गुलाबरावांनी विरोधकांना सुनावलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com