Solapur NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur NCP : सोलापूर शहर राष्ट्रवादीची 146 पदाधिकाऱ्यांची जंबो कार्यकारिणी जाहीर

NCP Executive Announced : उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सोलापूर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहरातील पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत मुंबईत देवगिरी बंगल्यावर आढावा बैठक झाली.

Vijaykumar Dudhale

Solapur, 21 March : निवडणुकीच्या मोसमात राष्ट्रवादी काँग्रेसची सोलापूर शहराची 146 पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आज जाहीर केली. यामध्ये तब्बल 16 उपाध्यक्ष, 35 सरचिटणीस नेमण्यात आले आहेत. शहराचे समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या हस्ते येत्या शनिवारी (ता. 23 मार्च) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

नूतन कार्यकारिणीमध्ये 1 जनरल सेक्रेटरी, 16 उपाध्यक्ष, 2 प्रवक्ते, 1 खजिनदार, 35 सरचिटणीस, 17 सचिव, 6 संघटन सचिव, 17 संघटक, 3 विधानसभा अध्यक्ष, 3 विधानसभा कार्याध्यक्ष, 1 सहसचिव, 8 मार्गदर्शक व कायम निमंत्रित, 31 कायम निमंत्रित, 4 कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सोलापूर (Solapur) जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहरातील पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत मुंबईत देवगिरी बंगल्यावर आढावा बैठक झाली. त्या बैठकीत सोलापूर शहराच्या 146 पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्ष तटकरे आणि प्रदेश सचिव शिवाजीराव गर्जे यांनी मान्यता दिली. बैठकीला सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे यांची उपस्थिती होती.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवून त्यांचे हात बळकट करण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी काम करावे, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पदाधिकारी काम करतील आणि पक्षाला चांगले यश मिळवून देतील, अशी ग्वाही आमदार माने यांनी या बैठकीत पक्षश्रेष्ठींना दिली आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सर्व समाज घटकांना न्याय देताना जंबो कार्यकारिणी जाहीर केली आहे. सोलापूरच्या जिल्ह्याच्या तुलनेत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद नगण्य आहे. त्यामुळे पक्षसंघटना वाढवून विधानभसा आणि महापालिकेला यश मिळवून दाखवण्याचे आव्हान सोलापूर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांपुढे असणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT