Kolhapur Lok Sabha Constituency : चंदगडमध्ये महायुती गब्बर; पण अंतर्गत धुसफूसही तेवढीच मोठी...

Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणातील घोडेबाजार सर्वसामान्य मतदारांना रुचलेला नसल्याचे चित्र आहे. या विभागात शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीचे वातावरण आहे. ही सहानुभूती मतपेटीपर्यंत नेण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीतील नेत्यांपुढे आहे.
Sharad Pawar-Shahu Maharaj-Rajesh Patil-Samarjeetshinh Ghatge
Sharad Pawar-Shahu Maharaj-Rajesh Patil-Samarjeetshinh GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 21 March : कोल्हापूरच्या राजकारणात अत्यंत दुर्गम आणि दुर्लक्षित विधानसभा मतदारसंघ म्हणून चंदगडकडे पाहिलं जाते. मात्र, लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघाची लक्षवेधी आणि महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कर्नाटक सीमेला लागून असलेल्या या मतदारसंघाचा बराचसा संपर्क बेळगावशी असतो. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या संपर्कात न राहणारा हा मतदारसंघ आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारा चंदगड मतदारसंघ आहे.

मागील पाच वर्षांत आघाडी विरुद्ध युती अशी लढत चंदगड (Chandgarh) मतदारसंघात झाली होती. भाजपशी बंडखोरी करून शिवाजी पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादीकडून आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपकडून अशोक सराटी यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपमध्ये झालेल्या मत विभागणीचा फायदा राष्ट्रवादीच्या राजेश पाटील यांना झाला आणि पाटील यांचा विजय झाला. पण, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील, अशोक चराटी, संग्रामसिंह कुपेकर आणि शिवाजी पाटील हे महायुतीत असल्याने महायुतीचा उमेदवार येथे गब्बर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Shahu Maharaj-Rajesh Patil-Samarjeetshinh Ghatge
Loksabha Election 2024 : कोल्हापूर-करवीर; चेतन नरकेंचे डावपेच वाढविणार महायुती अन् महाविकास आघाडीची डोकेदुखी...

संभाव्य उमेदवारांपैकी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे दाजी आमदार राजेश पाटील यांचा नातेसंबंधाचा अधिक फायदा होणार आहे. मात्र, शिवसेना (ठाकरे गट) आणि ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील गटाच्या मतांची वजाबाकी भरून काढणे हेही आव्हान असेल. भाजपच्या नेत्यांमध्ये खासदार मंडलिक यांच्याबदल नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीपासून (Loksabha Election 2024) कोणत्याच नेत्यांशी त्यांनी संपर्क ठेवला नसल्याचा आरोप भाजपचे नेत्यांनी केला आहे. हे आव्हान थोपवणे खासदार संजय मंडलिक यांच्या पुढे आहे. जर संभाव्य उमेदवारांमध्ये भाजपचे समरजितसिंह घाटगे यांना उमेदवारी दिल्यास चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये एकतर्फी कल महायुतीच्या बाजूने असल्याचा अंदाज आहे.

राज्य पातळीवर बदललेल्या राजकीय समीकरणाचाही स्थानिक राजकारणावर परिणाम दिसेल. भाजपचे भरमूअण्णा पाटील, शिवाजीराव पाटील, संग्रामसिंह कुपेकर, प्रकाश चव्हाण, आजऱ्यातून अशोक चराटी, सुधीर देसाई गटाचीही साथ मिळेल. महाविकास आघाडीतून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या नावाबाबत सर्वसामान्यांतून आदराचे स्थान आहे. त्याचा लाभ महाविकास आघाडीला होईल का नाही, हे आत्ताच सांगणे कठीण आहे.

Sharad Pawar-Shahu Maharaj-Rajesh Patil-Samarjeetshinh Ghatge
Kolhapur Politics : लोकसभेतील एकी विधानसभेत ठरणार डोकेदुखी; कोल्हापूरच्या 6 मतदारसंघाचे 'असे' आहे राजकीय गणित

माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, गोपाळराव पाटील, मुकुंद देसाई, जयवंतराव शिंपी, अंजना रेडेकर, स्वाती कोरी, सुनील शिंत्रे, अमर चव्हाण, विद्याधर गुरबे, संभाजीराव देसाई आणि या विभागातील पूर्वांपारचा शिवसैनिक ही महाविकास आघाडीची बलस्थाने असतील. शिवाय पालकमंत्री असताना आमदार सतेज पाटील यांनी स्वतःची यंत्रणा सक्षम केली आहे. त्याचाही लाभ होईल.

चंदगड, आजरा विभागात पूर्वीपासून पक्षापेक्षा स्थानिक गटांचे राजकारण चालते. नेता म्हणजेच पक्ष आणि नेता म्हणजेच गट अशी स्थिती आजही कायम आहे. त्याचवेळी गडहिंग्लज विभागात मात्र पक्षाचे महत्त्व मोठे आहे. याचे श्रेय माजी विधानसभा अध्यक्ष (स्व.) बाबासाहेब कुपेकर यांना जाते. (स्व.) कुपेकर यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर श्रद्धा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) घराघरांत पोहोचवण्याचे काम केले. तो पाया आजही मजबूत आहे.

Sharad Pawar-Shahu Maharaj-Rajesh Patil-Samarjeetshinh Ghatge
Mohite Patil News : माढ्याबाबत मोठी अपडेट; धैर्यशील मोहिते पाटील पवारांना बारामतीत जाऊन भेटणार?

शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग गडहिंग्लज तालुक्यात आहे. शिवाय चंदगड आणि आजरा विभागातील शेतकरी, नोकरदार वर्गात त्यांच्याविषयी आदर आहे. राज्याच्या राजकारणातील घोडेबाजार सर्वसामान्य मतदारांना रुचलेला नसल्याचे चित्र आहे. या विभागात शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीचे वातावरण आहे. ही सहानुभूती मतपेटीपर्यंत नेण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीतील नेत्यांपुढे आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Sharad Pawar-Shahu Maharaj-Rajesh Patil-Samarjeetshinh Ghatge
Mohite Patil Sangola Tour : धैर्यशील मोहिते पाटलांनी गाठले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यालय....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com