Mohite Patil News : माढ्याबाबत मोठी अपडेट; धैर्यशील मोहिते पाटील पवारांना बारामतीत जाऊन भेटणार?

Madha Lok Sabha Constituency : धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटीच्या संदर्भात निरोप जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार बारामतीमध्ये उद्या (ता. 22 मार्च) धैर्यशील मोहिते आणि शरद पवार या दोघांमध्ये भेट घडवून आणण्याचे प्रयत्न होणार आहेत.
Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Dhairyasheel Mohite Patil-Sharad PawarSarkarnama

Solapur, 21 March : माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात राजकीय पटलावर वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाने उमेदवारीत डावलल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पार्टीच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यातूनच उद्या (ता. 22 मार्च) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची बारामतीत भेट होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे माढ्यात भाजपला झटका बसण्याची चिन्हे आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha Constituency) उमेदवारीवरून सध्या महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. भाजपने उमेदवारी नाकारलेले धैर्यशील मोहिते पाटील सध्या मतदारसंघात गाठीभेटीच्या माध्यमातून कामाला लागले आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील (Mohite Patil) यांच्याकडून कडाडून विरोध केला जात आहे. मात्र, निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्याची नामुष्की भाजप स्वीकारणार, हा खरा प्रश्न आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Mohite Patil Sangola Tour : धैर्यशील मोहिते पाटलांनी गाठले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यालय....

धैर्यशील मोहिते पाटील हे सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा आणि सांगोला तालुक्याचा दौरा आटोपून आज माण खटाव मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. अगदी भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातच मोहिते पाटील भेटीगाठीचा सिलसिला सुरू केला आहे. मतदारसंघात फिरत असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे कोणत्या पक्षाकडून लढणार, याबाबत जाहीर भाष्य करत नसले तरी त्यांची पावले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार हे माढा लोकसभा जागेच्याबाबत काय निर्णय घेणार? याची उत्सुकता सर्वांना आहे. कारण त्यांनी महादेव जानकर यांच्यासाठी माढ्याची जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, जानकर हे परभणीसाठी अडून बसले आहेत. त्यामुळे माढ्याबाबत काय होणार, याची उत्सुकता असताना माढ्याबाबत मोठी अपडेट पुढे आली आहे.

Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Rajendra Mirgane News : बार्शीच्या राजेंद्र मिरगणेंवर भाजपने सोपवली महत्त्वपूर्ण जबाबदारी

धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटीच्या संदर्भात निरोप जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार बारामतीमध्ये उद्या (ता. 22 मार्च) धैर्यशील मोहिते आणि शरद पवार या दोघांमध्ये भेट घडवून आणण्याचे प्रयत्न होणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांचा निरोप घेऊन आज काही जण शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे माढा लोकसभेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे?

R

Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Mahavikas Aghadi Dispute : महाविकास आघाडीत वाद पेटला; मिरजेतील ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com