Solapur, 13 October : सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात पक्षातूनच दंड थोपटले आहेत. आमदार देशमुख यांच्या उमेदवारीला त्यांनी विरोध दर्शविला आहे, त्यामध्ये ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद थोबडे यांचाही समावेश होता. आता त्याच थोबडेंनी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढविण्याची आपली तयार आहे, असे त्यांनी आज सांगितले.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून (Solapur City North Assembly Constituency) माजी महापौर शोभा बनशेट्टी, माजी सभागृह नेते जगदीश पाटील यांच्यासह सात माजी नगरसेवकांनी विजयकुमार देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्यांमध्ये सोलापूरमधील ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद थोबडे यांचा समावेश आहे.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ॲड. मिलिंद थोबडे (Milind Thobde) यांनी भारतीय जनता पक्षाकडे (BJP) उमेदवारी मागितली आहे. उमेदवारीसंदर्भात भाजप सकारात्मक निर्णय घेईल. मात्र, भाजपने उमेदवारी देण्यात डावलले तर अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा ॲड. थोबडे यांनी केली आहे. त्यामुळे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून थोबडे हे आमदार देशमुख यांना आव्हान देऊ शकतात.
ॲड मिलिंद थोबडे म्हणाले, सोलापूरमधील मिल एकापाठोपाठ बंद पडत गेल्या, त्याच्या जागी नवीन उद्योग आले नाहीत. बारामती दोन हजार, अमरावतीत एक हजार कोटी रुपयांचे प्रकल्प आले. हे तेथील नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. सोलापूर शहर एकेकाळी चार नंबरवर होते. आता आपण दहा बारा नंबरवर गेलो आहोत, त्याचा आपण विचार करणार आहोत का नाही.
सोलापूरला दररोज पाणी मिळायला पाहिजे. रोजगाराचा प्रश्न कायम आहे. मिलेट सेंटर बाहेर गेलं आहे. टेक्सटाईल्स उद्योगातही आपण मागे पडत आहोत. त्यामुळे समाजकारणाच्या उद्देशाने मी आगामी निवडणूक लढवणार आहे.
विरोधी पक्षात असूनही आपल्याला निधी आणता येतो. अक्कलकोटच्या आमदाराने चार हजार कोटी रुपयांचा निधी आणला. मग सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात का निधी येत नाही. त्यासाठी येथील नेतृत्व कमी पडले का असा प्रश्न आहे, असेही ॲड. थोबडे
मी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. बदल करण्याची गरज आहे. माझ्या दृष्टीकोनातून सोलापूर शहर बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्यासारख्या माणसाने आता लोकांची प्रतिनिधीत्व करण्याची वेळ आली आहे. भाजपने मला उमेदवारी दिली तर ठीक नाही तर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याचा इशाराही ॲड. थोबडे यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.