Pankaja Munde News : '' मी भाजपची, पण भारतीय जनता पार्टी माझी थोडीच आहे!''; मुंडेंचा दिल्लीत नाराजीचा सूर...

Pankaja Munde & Mahadev Jankar : '' आम्हाला काहीच नाही मिळालं तर मी जाईन ऊस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला...''
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Delhi : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे या नेहमी त्यांच्या रोखठोक विधानांमुळे चर्चेत असतात. कधी त्या पक्षाला घरचा आहेर देतात, स्वपक्षीय नेते मंडळींनाही टोले लगावतात तर कधी विरोधकांवर टीकेचा आसूड ओढतात. पण आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी हे मोठं विधान केलं आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे असं विधान केलं आहे.

दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी जोरदार फटकेबाजी केली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित होते.

Pankaja Munde
Mumbai News : ज्या शाळेत शिकला, त्याच शाळेच्या मुख्याध्यापकाच्या मुलाला गंडा घातला...; काय आहे प्रकरण?

यावेळी मुंडे म्हणाल्या, जानकर म्हणताय तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप(BJP) खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण तो मोठा पक्ष आहे, असं धक्कादायक विधानही पंकजा मुंडे यांनी केलं.

“काही नाही मिळालं तर ऊस तोडायला जाईन”

दरम्यान, राजकीय आयुष्याबाबतही पंकजा मुंडेंनी यावेळी मिश्किल टिप्पणी केली. “आम्हाला इतर गोष्टींचं वाईट वाटतच नाही. कदाचित आमच्या रक्तातच ते असावं. आम्ही घाबरत तर कुणालाच नाही. आम्हाला काहीच नाही मिळालं तर मी जाईन ऊस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला. आणखी काय होईल? आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीची लालसा, आस्था, अपेक्षा नाहीच असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

Pankaja Munde
Resignation Of 9 Doctors: मोठी बातमी! डॉ. लहानेंसह जे.जेच्या ९ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे, केले 'हे' गंभीर आरोप

'' ...आणि मुंडे साहेबांचं 'ते' स्वप्न मी पूर्ण केलं!''

महादेव जानकर(Mahadev Jankar) यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी मी पक्षाकडे आग्रही भूमिका मांडल्याचंही मुंडे यांनी यावेळी म्हटलं. त्या म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांनी महादेव जानकर यांना मुलगा मानलं होतं.जानकरांना कॅबिनेट मंत्री बनवण्याचं मुंडे साहेबांचं स्वप्नं होतं. आणि ते मी पू्र्ण करुन दाखवलं. मी जानकर यांना राज्यमंत्री पद नाही तर कॅबिनेट मंत्री दिलं गेलं पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली होती. आणि त्यामुळे एनडीएतल्या अनेक मोठ्या पक्षांना राज्यमंत्री दिलं गेलं पण जानकरांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं गेलं. आणि साहेबांचं स्वप्न पूर्ण केलं. तसेच जानकरांना उमेदवारी देताना मी सहा वर्षांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते असंही मुंडे यावेळी म्हणाल्या.

''...म्हणून जानकर नशीबवान!''

पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमात जानकर यांच्याशी असलेल्या भावा-बहिणीच्या नात्यावर भाष्य करताना त्यांच्या अविवाहितपणावर मिश्किल टिप्पणी केली. त्या म्हणाल्या “महादेव जानकरांनी तर लग्नच केलेलं नाही. खूप चांगलं काम केलं त्यांनी. मी तर म्हणेन यामुळे ते नशीबवान आहेत. यामुळे ते समाजासाठी पूर्णपणे झोकून देऊन काम करू शकतात. कुणीही त्यांच्याकडे गाडी मागणार नाही, घर मागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi)ही यामुळेच समर्पित भावनेनं काम करू शकतात. त्यांना फक्त या देशाच्या जनतेची देखभाल करायची आहे असं मुंडे यांनी सांगितलं.

Pankaja Munde
Prakash Ambedkar News: "पवारांचा कित्ता भुजबळांनी गिरवावा; आंबेडकरांनी करुन दिली ही आठवण..

''..अन् ते म्हणतील, उद्या माझं लग्न आहे!”

“ महादेव जानकर आज अशा सुटाबुटात आले, मला तर वाटलं आज लग्नंच करतायत की काय. मला नेहमी वाटतं की कधीतरी मला फोन करतील आणि मला म्हणतील उद्या माझं मंदिरात लग्न आहे, तुम्ही या, तुम्ही त्या कार्यक्रमाच्याही अध्यक्ष आहात. मुंडेंच्या निधनानंतर त्यांनी हे जाहीर करून टाकलं की ३१ मे चे त्यांच्या पक्षाचे जेवढे कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमांना मीच अध्यक्ष असेन”, अशी मिश्किल टिप्पणीही यावेळी पंकजा मुंडेंनी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com