Praniti Shinde, Solapur, Congress Crisis, Local Elections Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Congress : प्रणिती शिंदेंनी सोलापूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला वाऱ्यावर सोडलं? निवडणुकीपूर्वीच पक्ष बॅकफुटवर

Solapur Congress : विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमधील उत्साह कमी झाला आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये पदाधिकारी अलिप्त राहिल्याने पक्षाची ताकद कमी झाली असून पक्ष बिकट स्थितीत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिकांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पण या निवडणुकीत देशातील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसची ताकद घटली असून 11 नगरपालिकांपैकी एकाही नगरपालिकेत सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार मिळाले नाहीत. ग्रामीणमध्ये काँग्रेसकडे चेहराच नसल्याने पंढरपूर व मंगळवेढा या नगरपालिकेत स्थानिक आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.

11 पैकी 5 नगरपालिकांमध्ये काँग्रेसने हात चिन्हावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले आहेत. यामध्ये कुर्डूवाडी, बार्शी, अक्कलकोट, दुधनी व मोहोळ या पाच ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठांना 11 नगरपालिकेत उमेदवार निवडीसाठी शोधाशोध करावी लागली. सांगोला, करमाळा याठिकाणी सपशेल माघार घेतली आहे तर पंढरपूर व मंगळवेढा या दोन नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षासह नगरसेवक पदासाठी पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेस पक्षावर आली आहे.

नगरसेवकपदांसाठी जे उमेदवार दिले आहेत, त्यांची संख्या समाधानकारक नाही. अक्कलकोट वगळता इतर ठिकाणी निम्मेही उमेदवार मिळाले नाहीत. अक्कलकोट नगरपालिकेच्या 25 पैकी 14 ठिकाणी उमेदवार दिले आहेत. बार्शी - 40 पैकी 12, कुर्डूवाडी - 18 पैकी 11, मोहोळ - 20 पैकी 11, दुधनी - 20 पैकी 12 तर अकलूजमध्ये 26 पैकी 2 ठिकाणी उमेदवार देता आले आहेत.

पक्षावर आत्मचिंतनाची वेळ...

लोकसभा निवडणूक निकालानंतर देशभरात काँग्रेस पुन्हा उभारी घेत असल्याचे चित्र होते. पण पुढील सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राज्यात काँग्रेससह महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली. महायुतीने मोठे यश मिळवल्याने काँग्रेसला पक्षसंघटनासाठी परिश्रम घेणे आवश्यक होते. खासदार प्रणिती शिंदे यांनी सर्व काँग्रेसी नेत्यांना किमान जिल्हास्तरावर एकत्र करत काँग्रेस नेत्यांची मोट बांधणे, त्यांना विश्वास देण्याची गरज असताना तसे दिसले नाही.

पदाधिकाऱ्यांना ताकद मिळालीच नाही...

नगरपालिका, जिल्हा परिषद व महापालिका या निवडणुका कार्यकर्ते व पदाधिकारी यांना ताकद देण्यासाठी असतात. पण काँग्रेसमध्ये उलट चित्र दिसले. नगरपालिका निवडणूका जाहीर झाल्यानंतर मुलाखती एकाच दिवसात आटोपण्यात आल्या. मुलाखतीसाठी आलेले पदाधिकारी व कार्यकर्तेच पक्षापासून आलिप्त राहिल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणूक निकालानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह, ऊर्जा होती ती विधानसभा निकालानंतर दिसली नसल्यानेच आज जिल्ह्यात काँग्रेसची (Congress) बिकट अवस्था झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT