Solapur News: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार,सोलापूर जिल्हा बँकेच्या 19 पैकी 10 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपचीच एकहाती सत्ता येणार असल्याचं सध्यातरी चिन्हे आहेत.
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधीच पणन आणि दुग्ध संस्था या दोन्ही मतदारसंघांतील आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर यापूर्वी माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचाही अर्ज बाद झाला होता. त्यामुळे मोहिते कुटुंबातील एवघे अर्जुनसिंह हे एकमेव उमेदवार अद्याप जिल्हा बँकेच्या मैदानात टिकून आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत यांच्यासह यशवंत शिंदे, विक्रांत पाटील, प्रशांत परिचारक, श्रीदीप हसापुरे, पृथ्वीराज माने, अजिंक्यराणा पाटील, सिद्धेश्वर आवताडे आणि शंभूराजे जगताप यांचा समावेश आहे.
भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवारी(ता.17)पत्रकार परिषद घेत यावर सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यानच्या घडामोडींवर थेट भाष्य केलं. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमच्याकडून सक्षम उमेदवार देणे हा क्रायटेरिया लावण्यात आला होता. तसं तर ही निवडणूक लागायलाच नको होती, मात्र ती लागल्याचंही त्यांनी म्हटलं.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनल असणार आहे. संचालक पदांसाठी 19 जागासाठी अर्ज भरले होते.त्यात विविध कार्यकारी सोसायटीमधील 9 मतदार संघ हे बिनविरोध झाले आहेत. तर इतर 8 पैकी ओबीसी गटातील उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. 19 पैकी 10 जागा भाजपच्या पॅनलचे बिनविरोध झालेले आहेत. उर्वरित 8 जागासाठी आम्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असल्याची माहिती परिचारक यांनी दिली.
प्रशांत परिचारक म्हणाले, तसेच ही निवडणूक पूर्ण एकतर्फी आहे.आमच्या पूर्ण पॅनलला यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही निवडणूक लागायलाच नको होती.त्यासाठीच मी आणि राजन पाटील यांनी मोहिते पाटील कुटुंबाशी चर्चा केली होती. त्यातून वास्तववादी चित्र त्यांनी स्वीकारलं असतं, तर आम्हीही स्वीकारलं असतं. मात्र,दुर्दैवानं ते झालं नाही.
आम्ही समन्वयातून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. त्याच पद्धतीनं जिल्हा बँकेचा चेअरमनसुद्धा निश्चित केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. अध्यक्षपदासाठी कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही, आमचा पक्ष ठरवेल तो अध्यक्ष असेल, असंही त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी स्पष्ट केलं.
तर माजी आमदार राजन पाटील म्हणाले,सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधकांनी अवास्तव जागा मागितल्यानं ती बिनविरोध झाली नाही. विरोधकांनी विचार करुन जागा मागायला हवी होती असे म्हणत माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी नाव न घेता निवडणूक लागण्याला मोहिते पाटलांवर निशाणा साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.