Tanaji Sawant
Tanaji Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी निलंबित : आरोग्य मंत्री सावंतांची विधान परिषदेत घोषणा

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब केला. या कारणावरून सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer) डॉ शीतलकुमार जाधव (Dr Sheetal Kumar Jadhav) यांचे निलंबन करण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी विधान परिषदेत केली. (Solapur District Health Officer suspended: Health Minister Sawant's announcement in Legislative Council)

भारतीय जनता पक्षाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ६८ उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सोलापूरच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन केले.

सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र सरकार २०१९ पासून २०२२ पर्यंत सरकार प्रस्ताव मागवत आहे. मात्र, सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी त्याला उत्तर देत नाहीत. हा जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे विधान परिषदेत आज मी त्यांच्या निलंबनाची घोषणा करत आहे. तसेच, त्यांची चौकशीही करण्यात येईल, असेही तानाजी सावंत यांनी आपल्या उत्तरात सांगितले.

डॉ. सावंत यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्राचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने नामंजूर झाला आहे. पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना बऱ्याचवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र परिपूर्ण प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाहीत, त्यामुळे सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांच्या निलंबनाची घोषणा करत आहे.

जानेवारीत आरोग्य विभागात नोकरभरती

आरोग्य विभागामध्ये रिकाम्या जागा असल्याबाबत उपप्रश्नाला उत्तर देताना डॉ सावंत यांनी सांगितले की, आरोग्य विभागाची बिंदूनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. येत्या जानेवारी महिन्यात नोकरी भरतीची जाहिरात काढण्यात येणार आहे. कंत्राटी तत्वावरील एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT