कर्नाटकविरोधात ठराव : जयंत पाटील-दरेकरांमध्ये जोरदार खडाजंगी; 'चर्चेबाबत दरेकर तुम्ही ठरवणार नाही'

कर्नाटकाविरोधात ठराव करताना चर्चा करायची नाही, असं कामकाज सल्लागार समितीत ठरलं
Jayant Patil and Praveen Darekar
Jayant Patil and Praveen DarekarSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : कर्नाटकविरोधात (Karnatka) ठराव करताना विधान परिषदेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) आणि शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ठराव करताना चर्चा करायची नाही, असं ठरलं. मात्र, माझा त्याला विरोध आहे, असे जयंत पाटील म्हणाले. त्याला दरेकर यांनी विरोध केला. त्यावर चर्चा करायची की नाही, हे सभागृह ठरवणार आहे. दरेकर तुम्ही ठरवणार नाही, असे उत्तर जयंत पाटील यांनी दिले. त्यामुळे सोमवारी सकाळीच विधान परिषदेत जोरदार खडजंगी पहायला मिळाली. (Resolution against Karnataka : Strong fight between Jayant Patil and Darekar)

कर्नाटकाविरोधात ठराव करताना चर्चा करायची नाही, असं कामकाज सल्लागार समितीत ठरलं. पण माझा त्याला विरोध आहे. ठरावावर चर्चा झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. चर्चा करायची की नाही, हे सभागृह ठरवणार आहे. दरेकर, तुम्ही ठरवणार नाही. मी सल्लागार समितीतही विरोध केला होता. ठरावावर चर्चा झाली पाहिजे, अशी माझी मागणी होती, असे पाटील म्हणाले.

Jayant Patil and Praveen Darekar
ग्रामपंचायतमधील मोठ्या यशानंतरही आमदार गोगावलेंनी केली कार्यकर्त्यांची कानउघाडणी

ते म्हणाले की, माझा मुख्य आक्षेप असा आहे की ठराव वेगळा आणि चर्चा वेगळी आहे. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तुम्ही चर्चा करू शकता. आज चर्चा सुरू झाली आहे, तर त्यात सर्वांनी भाग घ्यायचा. सत्ताधारी पक्षानी त्या ठरावात स्पष्टता आणली नाही. ही चर्चा २६० मध्ये रुपांतरित झाली पाहिजे. ठराव हा वेगळा विषय आहे. यावरून आपण रुलिंग दिलं नाही.

Jayant Patil and Praveen Darekar
आमच्या विरोधकांना रेटून खोटं बोलण्याची सवय : ग्रामपंचायतींच्या दाव्यावरून भरणेंचा पाटलांना टोला

त्यावर सभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, रुलिंग देण्यासाठी मला सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागेल. तुम्हा सर्वांना चहासाठी बोलावं लागेल. रुलिंग देऊन ही चर्चा २६० मध्ये कर्न्व्हट करणे सर्वांना मान्य आहे का. त्यावर सत्ताधारी बाजूने नकार येताच या बाजूला मान्य नाही, जयंत पाटील तुम्ही समजून घ्या काही गोष्टी असे विधान केले.

Jayant Patil and Praveen Darekar
फडणवीसांनी दिला अक्कलकोटमधील नूतन सरपंचांना कानमंत्र : कल्याणशेट्टींनी केला २० सरपंचांचा सत्कार

त्यावर सभागृह नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, सभागृह नियमाप्रमाणं चाललं पाहिजे. नियमांमध्ये न बसता ९७ तुम्ही आणला आहे. संवदेनशील विषय असल्यामुळे कोणी काही बोलायचं नाही, असं ठरलं होतं. आता ते २६० मध्ये कर्न्व्हट करायचं म्हटलं तर सर्वांना घेऊन बसावं लागेल. त्यानंतर निर्णय करावा लागेल. तोपर्यंत ९७ साठी बारापर्यंत जो वेळ आहे, तोपर्यंत जे बोलतील ते बोलतील. पण, या चर्चेचं उत्तर ठरावाच्या की उत्तराच्या स्वरूपात द्यायचं हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून ठरविण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com