पवारांच्या फोननंतर अजितदादा आक्रमक : सत्तारांचा राजीनामा मागत फडणवीसांवर केला हल्लाबोल...

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आताच कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोन आणि आमदारांच्या नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आज विधानसभेत प्रचंड आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या अजितदादांनी प्रथम कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा राजीनामा मागितला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला. (After Pawar's call, Ajit Dada aggressive : Abdul Sattar demanded resignation...)

ते म्हणाले की, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करत वाशिम जिल्ह्यात ३७ एकर गायरान जमिनीचा गैरव्यवहार केला आहे. त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आताच कडश शब्दांत ताशेरे ओढले आहेत. तसेच, सिल्लोड कृषी महोत्सवासाठी राज्यभरातून वसुली सुरू आहे. याप्रकरणी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा.

Ajit Pawar
कर्नाटकविरोधात ठराव : जयंत पाटील-दरेकरांमध्ये जोरदार खडाजंगी; 'चर्चेबाबत दरेकर तुम्ही ठरवणार नाही'

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. वाशिम जिल्ह्यातील घोडबाभूळ येथील सुमारे ३७ एकर गायरान जमिनीचा सुमारे दीडशे कोटी रुपयांचा त्यांनी गैरव्यवहार केला आहे. संबंधित जमीन त्यांनी योगेश खंडारे यांना दिली आहे. न्यायालयाने ही मागणी अगोदर फेळाळली होती, असेही त्यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar
ग्रामपंचायतमधील मोठ्या यशानंतरही आमदार गोगावलेंनी केली कार्यकर्त्यांची कानउघाडणी

पवार म्हणाले की, तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेश असतानाही १७ जून २०२२ रोजी ३७ एकर जमीन योगेश खंडारे यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना सर्व कायदेशीर बाबींचे उल्लंघन करण्यात आले आहे, असे गंभीर निरीक्षण नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांविरोधात ठोस पुरावे उपलब्ध आहेत.

Ajit Pawar
आमच्या विरोधकांना रेटून खोटं बोलण्याची सवय : ग्रामपंचायतींच्या दाव्यावरून भरणेंचा पाटलांना टोला

जिल्हा कोर्टाचा आदेश माहिती असूनही त्यांनी तो निर्णय घेतला. तो घेताना सुप्रीम कोर्ट आणि राज्य सरकारच्या निर्णयाची सत्तार यांनी पायमल्ली केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तो निर्णय अवैध वाटल्याने महसूल विभागाच्या अतिरिक्त सचिवांना पत्र पाठवले. त्यात सुप्रीम कोर्टाचा अवमान होईल, असे मजकूर होता. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे पवार यांनी नमूद केले.

राज्यमंत्री सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. एका व्यक्तीला फायदा मिळवून दिला आहे. त्याची जबाबदारी स्वीकारून सत्तार यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी पवार यांनी केली आहे.

पवार म्हणाले की, सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी राज्यातून २५ ते ३० कोटी रुपये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. त्या कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांचे फोटो आहेत. उपमुख्यमंत्री महोदय अशा कार्यक्रमांना सरकारी तरतूद करता येते. पण सध्या वुसली सुरू आहे. सिल्लोड महोत्सवासाठी अधिकाऱ्यांना वेठीस धरण्यात आले आहे. हा भ्रष्टाचार नाही का. दीडशे कोटीची जमीन एकाच्या घशात घातली आहे,

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com