Malshiras News: पंढरपूर येथे झालेल्या दुष्काळी मोर्चानंतर भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटांमध्ये जोरदार राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूरला चांगला पालकमंत्री द्यावा अशी मागणी करत जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला होता.
त्यावर आता माळशिरसचे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. पतसंस्था बुडवून संचालक बदलणे इतके पालकमंत्री बदलणे सोपे नाही, अशा शब्दात मोहिते पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
माजी आमदार राम सातपुते म्हणाले, पालकमंत्री बदलणं किंवा पालकमंत्र्यांबाबत निर्णय घेणं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्याला एक कर्तृत्ववान पालकमंत्री दिला आहे, असे सांगत भाजप राम सातपुते यांनी पालकमंत्री बदलाच्या मागणीवरून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
या जिल्ह्यात सर्व योजना चांगल्या कशा होतील, शेतकऱ्यांना कशी मदत होईल, हा संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून कसा घोषित होईल याचा सर्व पाठपुरावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे, अशी माहितीही सातपुते यांनी यावेळी दिली.
विरोधकांनी केलेल्या टीकेवर मला हसायला येते. पालकमंत्री बदलाची भूमिका मांडणे हे तुमची एखादी पतसंस्था किंवा संस्था बुडत चालली आहे म्हणून संचालक बदलण्याइतके सोपे नाही. किंवा एखादी संस्था दिवाळखोरीत निघाली, स्वतःची सुमित्रा पतसंस्था बुडवायची, विजय मल्टिस्टेट बुडवायची, चेअरमन पदाचा राजीनामा द्यायचा आणि दुसऱ्या कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचा, इतके सोपे नाही पालकमंत्री बदलणे," असा घणाघात केला
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना, ते स्वतःला 'जलनायक' म्हणून घेतात पण त्यांच्या माण-खटाव मतदारसंघात ३४ पाण्याचे टँकर सुरू असल्याचा टोला लगावला.
ते म्हणाले, जयकुमार गोरे स्वतःची पाठ थोपटून घेत 'जलनायक' म्हणून मिरवतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्याच मतदारसंघात ३४ टँकर सुरू आहेत. त्यांनी आधी लोकांच्या पाणीटंचाईच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे असा जोरदार हल्लाबोल मोहिते पाटील यांनी गोरे यांच्यावर केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.