Someshwar Sugar Factory : सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आक्रमक; स्वबळाच्या हालचाली? पक्ष निरीक्षकांकडे जबाबदारी!

NCP preparation for Someshwar Sugar Factory election News : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवार चाचपणीदरम्यानच युतीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये वेगळाच सूर उमटल्याची चर्चा आहे.
someshvar sugar factory
someshvar sugar factory sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी पक्षाकडून निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून, संबंधित निवडणूक गटातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या मुलाखतीत युती करायची की स्वबळावर निवडणूक लढवायची? यावरही इच्छुकांची भूमिका जाणून घेण्यात आल्याची माहिती आहे.

पक्षाकडून नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकांकडून इच्छुक उमेदवारांची माहिती, त्यांचे पक्षातील काम, सभासदांशी असलेला संपर्क तसेच स्थानिक पातळीवरील स्वीकारार्हता याबाबत माहिती घेतली जात आहे. त्यानंतर वस्तुनिष्ठ अहवाल पक्ष नेतृत्वाकडे सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, उमेदवार चाचपणीदरम्यानच युतीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये वेगळाच सूर उमटल्याची चर्चा आहे. अनेक इच्छुकांनी कोणत्याही पक्षाशी युती न करता राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी भूमिका मांडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अंतिम निर्णयापूर्वीच कारखाना निवडणुकीतील राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे.

उमेदवारीत ‘निष्ठावंतां’चा मुद्दा ऐरणीवर

उमेदवार निवडताना केवळ राजकीय वजन किंवा वरिष्ठ नेत्यांशी असलेली जवळीक न पाहता, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी काही कार्यकर्त्यांकडून होत आहे. पक्षनिष्ठा, सातत्याने केलेले संघटनात्मक काम, सभासदांशी थेट संपर्क आणि स्थानिक पातळीवरील स्वीकारार्हता हे उमेदवारीचे महत्त्वाचे निकष असावेत, अशी भूमिका व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः तरुण आणि संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणीही पुढे येत आहे.

someshvar sugar factory
Someshwar Election: अजितदादांनंतर सहकारातील पहिल्या मोठ्या निवडणुकीची घोषणा : सुनेत्रा पवारांसमोर शिवसेनेचे आव्हान

‘निरीक्षकांना स्थानिक समीकरणांची माहिती आहे का?’

दरम्यान, उमेदवार चाचपणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकांच्या कार्यपद्धतीबाबत काही सभासदांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सोमेश्वर परिसरातील सहकार क्षेत्रातील गट-तट, स्थानिक राजकीय समीकरणे आणि सभासदांचे मतप्रवाह यांची पुरेशी माहिती निरीक्षकांना आहे का, अशी चर्चा काही सभासदांमध्ये आहे.

त्यामुळे केवळ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यापेक्षा सामान्य सभासद, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध गटांच्या प्रतिनिधींशी स्वतंत्रपणे संवाद साधावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गोपनीय पद्धतीने सभासदांचे मत जाणून घेतल्यास उमेदवारांबाबत अधिक वस्तुनिष्ठ चित्र पक्ष नेतृत्वासमोर येऊ शकते, असे काही सभासदांचे म्हणणे आहे.

someshvar sugar factory
Someshwar Election : शरद पवारांच्या भेटीनंतर सोमेश्वरच्या निवडणुकीत ट्विस्ट! बिनविरोधाच्या खेळीने अनेकांचे पत्ते कट?

सभासदांचा स्वबळाचा सूर; निर्णय नेतृत्वाच्या कोर्टात

सोमेश्वर कारखान्याच्या गेल्या पंचवार्षिक काळातील कारभाराबाबत काही सभासद समाधान व्यक्त करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादीची स्थानिक संघटनात्मक ताकद लक्षात घेता युतीपेक्षा स्वबळाचा पर्याय स्वीकारावा, असा सूर काही सभासदांमध्ये असल्याची माहिती आहे.

आता इच्छुकांच्या मुलाखती आणि स्थानिक पातळीवरील मत जाणून घेतल्यानंतर निरीक्षकांचा अहवाल पक्ष नेतृत्वाकडे जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड आणि निवडणूक युतीबाबत काय निर्णय होतो, याकडे सोमेश्वरच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com