Rakul Preet Singh IT Raid : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. काही काळापूर्वी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थन देणाऱ्या रकुल प्रीत सिंहच्या मुंबईतील ठिकाणांवर आता आयकर विभागाने कारवाई सुरू केली आहे.
आयकर विभागाच्या पथकांनी रकुल प्रीत सिंह, दिग्गज चित्रपट निर्माते वासु भगनानी आणि पॅनोरमा स्टुडिओजशी संबंधित सुमारे 12 ठिकाणी एकाच वेळी झडती सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटांचे प्रोडक्शन, शूटिंग आणि परदेशातील वितरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसा परदेशात पाठवण्यात आल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात येत आहे.
आयकर विभागाला कथित करचोरी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईतील विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
रकुल प्रीत सिंहसह वासु भगनानी आणि ‘दृश्यम’ फ्रेंचायझीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पॅनोरमा स्टुडिओजशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाचे अधिकारी कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करत आहेत. सध्या ही कारवाई सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिले होते समर्थन
दरम्यान, काही काळापूर्वी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रकुल प्रीत सिंहने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांना समर्थन दिले होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीला आणि स्वप्नांना महत्त्व असल्याची जाणीव असणे गरजेचे असल्याचे तिने म्हटले होते. तसेच तरुणांच्या आवाजाला सहानुभूती आणि आदर मिळायला हवा, अशी भूमिकाही तिने मांडली होती.
रकुलने पुढे निष्पक्ष आणि सकारात्मक संवादाची अपेक्षा व्यक्त केली होती. देशातील संस्थांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना योग्य उत्तरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सोशल मीडियातून भूमिका मांडणारी हीच अभिनेत्री आयकर विभागाच्या कारवाईमुळे चर्चेत आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.