Police presence outside a hospital in Solapur after the murder of an MNS student wing leader during a dispute linked to municipal election nomination withdrawals. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MNS Leader Murder: उमेदवारी अर्ज मागे घेण्यातून भाजपच्या गटात झाला टोकाचा वाद! मध्यस्थीसाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचा खून

Solapur Municipal Election : सोलापूर महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीच्या वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला असून, या घटनेमुळे निवडणूक हिंसाचारावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

विश्वभूषण लिमये

Solapur Murder News : सोलापूर महापालिका निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. अर्ज माघारीची घेण्याच्या वादातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्याचा खून झाला आहे. याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

बाळासाहेब सरवदे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सरवदे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते. सोलापूर महानगरपालिका प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या दोन गटात वाद झाला होता.

प्रभाग दोनमध्ये शालन शिंदे ह्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी शिंदे आणि सरवदे यांच्या गटात वाद झाला होता. या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालयदेखील फोडण्यात आले.

त्याचवेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्तीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, असा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. ह्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान प्रभाग 2 मधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी दबाव होता, माघारीसाठी सरवदे कुटुंबावर भाजप नेत्याकडून दबाव आणला जात होता.

समाजात वाद नको;म्हणून मनसे नेते बाळासाहेब सरवदे गेले होते, त्यावेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांचा खून केल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केला आहे. दरम्यान, सरवदे खूनप्रकरणी सोलापुरातील जेल रोड पोलिसांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT